बॉलीवूड इंडस्ट्रीमधील मोस्ट पॉपुलर सिंगर्समधील एक जुबिन नौटियालच्या लग्नाच्या चर्चा आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. तो लवकरच शाहिद कपूरच्या कबीर सिंह चित्रपटामध्ये त्याच्या अपोजिट काम करणाऱ्या अभिनेत्री निकिता दास सोबत लग्न करणार आहे. बातमीनुसार त्यांना अनेक वेळा एकत्र स्पॉट केले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातमीवर पुष्टी झाली आहे.
पर्वतामधील शान म्हणून ओळखला जाणारा जुबिन नौटियाल आणि निकिता एकत्र फिरण्याशिवाय देखील एकमेकांबद्दल आपले प्रेम सोशल मिडियावर व्यक्त करताना पाहायला मिळतात. ते नेहमी एकमेकांच्या पोस्ट कमेंट करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये निकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली होती.
विशेष गोष्ट हि आहे कि हा फोटो तिचा नव्हता तर या फोटोमध्ये जुबिन नौटियाल बसलेला दिसत आहे. या फोटोमध्ये जुबिनला नदीकडे तोंड करून बसलेले पाहू शकता. फोटो शेयर करताना निकिताने लिहीले आहे कि, मी या मनमोहक पर्वतांमध्ये माझा आत्मा सोडून आले आहे.
दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांवर या पोस्टने हवा देण्याचे काम केले आहे. जुबिन नौटियालने निकिताच्या पोस्टवर कमेंट करतना तिला विचारले होते कि, तू तुझे हृदय देखील तिथे विसरून आली का? या पोस्ट शिवाय देखील इतर अनेक पोस्टवर दोघांना कमेंट करताना पाहायला मिळते. सोशल मिडियावर चाहते दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
माहितीनुसार निकिता जुबिन नौटियालच्या उत्तराखंड येथील घरी देखील गेली होती, जिथे ती तिच्या कुटुंबाला देखील भेटून आली आहे. दोघांचे कुटुंब या नात्यावर खूपच खुश आहेत आणि लवकरच याला लग्नाचे नाव देण्याच्या तयारीत आहेत.
View this post on Instagram
माहितीनुसार हे जोडपे लग्नाच्या तयारीत आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असेल जे उत्तराखंडच्या पर्वतरांगामध्ये सेट केले जाईल. तथापि या बातम्यांवर जुबिन किंवा निकिताकडून कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाही, पण त्यांचे चाहते हि बातमी ऐकून खूपच एक्साइटेड वाटत आहेत.