अभिनेता जॉन अब्राहम आपल्या एक विलेन रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि दिशा पटानीसोबत पाहायला मिळणार आहे. अॅक्शन-थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि भूषण कुमारच्या टी-सीरीज़ने प्रोड्यूस केले आहे.
जॉन अब्राहम म्हणाला कि एक प्रोड्यूसर म्हणून त्याला ओटीटी प्लेटफॉर्मवर कोणतीही आपत्ती नाही. त्याला हे देखील पसंद आहे पण एक अभिनेता म्हणून त्याने स्वतःला फक्त मोठ्या पडद्यावरील हिरो म्हणून पाहिले आहे. जॉन अब्राहमचा शेवटचा चित्रपट अटैक पार्ट १ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळ जवळ दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला होता.
आता अभिनेत्यांने स्पष्ट सांगितले आहे कि त्याला फक्त मोठ्या पडद्यावरच रस आहे. चित्रपट प्रोड्यसर म्हणून जॉन म्हणाला कि त्याला ओटीटी स्पेस आवडत होते पण तेव्हापर्यंत फक्त तो निर्माता होता. एक अभिनेता म्हणून मला सिने स्क्रीन आवडते. त्याची प्रोडक्शन कंपनी, जॉन अब्राहम एंटरटेनमेंटने शूजीत सरकार द्वारा निर्देशित २०१२ चा चित्रपट विक्की डोनर आणि २०१३ मधील मद्रास कॅफे चित्रपटामध्ये सहयोग केला होता. यामध्ये जॉनने देखील अभिनय केला होता.
जॉन म्हणाला कि एक निर्माता म्हणून मला ओटीटी स्पेस पसंद आहे. या प्लेटफॉर्मसाठी चित्रपट बनवणे आणि त्याला दर्शकांसाठी प्रदर्शित करणे पसंद करेन. पण एक अभिनेता म्हणून स्पष्टच सांगतो कि मी मोठ्या पडद्यावरच काम करेन. जॉन म्हणाला कि त्याला हा विचार नाही आला कि त्याने घरामध्ये स्क्रीनवर २९९ किंवा ४९९ रुपये देऊन पाहावेत. तो पुढे म्हणाला कि त्याचा चित्रपट जर कोणी मध्येच पाहायचा सोडून देईल तर तो नाराज होईल.
जॉन म्हणाला कि मी मोठ्या पडद्यावरचा हिरो आहे आणि मला हेच चांगले आहे. यावेळी मी असा चित्रपट करेन जो फक्त मोठ्या पडद्यासाठी बनवला जाईल. याचबरोबर मी २९९ रुपये किंवा ४९९ मध्ये उपलब्ध होऊ इच्छित नाही.
View this post on Instagram
यादरम्यान जॉनचा पुढचा चित्रपट एक विलेन रिटर्न्स २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित केला जाणार होता. चित्रपटाचे निर्देशन मोहित सुरीने केले आहे. ज्याने २०१४ चा एक विलेन चित्रपट देखील निर्देशित केला होता.