बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री जया बच्चन सध्या तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये आहे. आता तिने एका पॉडकास्टमध्ये तिची नात नव्या नवेली नंदाला रिलेशनशिपचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तिच्या ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. तथापि जया आणि नव्याचे एकमेकांशी खूप घट्ट नाते आहे.
जया बच्चनने नव्याच्या व्हाट द हेल नव्या पॉडकास्टमध्ये तिची नात आणि मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत मिळून मॉडर्न लव्ह रोमान्स आणि रीग्रेट्स या विषयावर चर्चा केली आहे. तिने पॉडकास्टमध्ये उघडपणे बोलताना म्हंटले कि आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रयोग करू शकत नव्हते आणि एक नाते प्रेम, ताजी हवा आणि समायोजन यावर नाते टिकू शकत नाही. पण पॉडकास्ट दरम्यान तिच्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामध्ये ती म्हणते कि जर नव्या लग्न न करताच मुलाला जन्म देत असेल तर आम्हाला त्यामध्ये काहीच अडचण नाही.
दिग्गज अभिनेत्री पुढे म्हणाली कि लोकांना माझ्या या गोष्टीवर अक्षेप असू शकतो. आम्ही लोक आमच्या काळामध्ये अशाप्रकारचे प्रयोग करू शकतो नव्हतो पण आताची जनरेशन असे करू शकते. कारण हे दीर्घकाळ नाते तीक्व्ण्यसाठी खूपच जरुरीचे आहे. जर लोक फिजिकल रिलेशनशिपमध्ये नसतील तर त्यांचे नाते जास्त काळ टिकत नाही. मला वाटते कि तुम्ही प्रेम, ताजी हवा आणि कंपेटिबिलिटीवर टिकून राहू शकत नाही हे खूप जरुरीचे आहे.
जया बच्चन नवीन जनरेशनला सल्ला देत पुढे म्हणाली कि मी याला खूपच मेडीकली रूपाने पाहते. आज रोमांस… मला वाटते कि तुम्हाला तुमच्या सर्वात चांगल्या मित्रासोबत लग्न केले पाहिजे. मला कोणतीही समस्या नाही. तुम्ही लग्न न करताच मुलाला जन्म देखील देऊ शकता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या रॉकी और रानी की प्रेम कहानी में रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आजमीसोबत ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे जो पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.