अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला आहे. १९७३ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. ४९ वर्षांपासून हे कपल एकमेकांची साथ देत आहे. तथापी त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही चढ-उतार पाहायला मिळाले होते पण दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.

लग्नाच्या नंतर काही दिवस जयाने चित्रपटांमध्ये काम केले पण एक दिवस मुलगी श्वेताने तिला असे काही म्हंटले कि त्यामुळे तिने बॉलीवूडमधून काढता पाय घेतला आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळू लागली. मुलीने असे काय म्हंटले होते ज्यामुळे जया बच्चन हे पाऊल उचलावे लागले पाहूयात.

श्वेतानंतर जया अभिषेकची आई बनली. दोन मुले झाल्यानंतर देखील जया चित्रपटांमध्ये बीजी राहायची. कामामुळे ती आपल्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नव्हती. श्वेता बच्चना घरामध्ये आईची कमी जाणवत होती. एक दिवस श्वेताने आईला म्हंटले कि, तू घरामध्ये आमच्या सोबत का राहत नाहीस. काम फक्त वडिलांना करू दे. मुलीची हि गोष्ट ऐकल्यानंतर जया पूर्णपणे हादरून गेली.

मुलगी श्वेताची हि गोष्ट ऐकल्यानंतर जया बच्चनने यावर गंभीरतेने विचार केला आणि तिला याची जाणीव झाली कि मुले तिला मिस करतात आणि नंतर तिने अभिनयच्या जगतामधून काढता पाय घेतला आणि संपूर्ण वेळ आपल्या मुलांसाठी देऊ लागली.

जया बच्चनने आपल्या करियरची सुरुवात गुड्डी चित्रपटामधून केली होती. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. लग्नाच्या अगोदर आणि नंतर देखील तिने पती अमिताभ बच्चनसोबत अनेक चित्रपट केले. गुड्डी चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि जयाची भेट झाली होती.

हळू हळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. १९७३ मध्ये आलेल्या जंजीर चित्रपटानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे म्हंटले जाते कि बिग बीने निश्चय केला होता कि जर जंजीर हिट झाला तर संपूर्ण टीम लंडनला फिरायला जायचे.

जेव्हा हि गोष्ट त्यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांना सांगितली तेव्हा त्यांनी एक अट ठेवली कि लग्न न करता अमिताभने जयासोबत फिरायला जाऊ नये आणि यामुळे दोघांनी घाईघाईने आपले लग्न उरकून घेतले.