२१५ करोडचे गिफ्ट वसूल करणाऱ्या अभिनेत्रीला आली देवाची आठवण, डोक्यावर ओढणी घेऊन पोहोचली मंदिरात…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या प्रवर्तन निदेशालयच्या कारवाईमुळे खूपच वादामध्ये अडकली आहे. यादरम्यान अभिनेत्रीला नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. जिथून तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ईडीने अभिनेत्रीला २१५ करोड रुपयेच्या जबरदस्ती वसुलीमध्ये आरोपी बनवले आहे. या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस सोमवारी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात स्पॉट झाली. अभिनेत्री यादरम्यान ग्लॅमरपासून खूपच दूर अगदी सध्या वेशामध्ये पाहायला मिळाली.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री माथ्यावर टीका लावलेली, सिंपल ब्लू कलरच्या सूटमध्ये दिसली. तिने माथ्यावर टीका लावला आहे आणि देवदर्शन केल्यानंतर मंदिराबाहेर येत आहे. जॅकलिनचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेक यूजर्सनी अभिनेत्रीच्या साध्या लूकचे कौतुक केले आहे.

यादरम्यान जॅकलीनने तोंडावर मास्क लावला आहे. हाऊसफुल अभिनेत्री २०० कोटींहून अधिक रकमेच्या जबरदस्ती वसुली प्रकरणामध्ये कॉनमन सुकेश चंद्रशेखरला ताब्यात घेतल्यानंतर वादात सापडली होती. या प्रकरणामध्ये जॅकलिनची यापूर्वी देखील चौकशी केली गेली आहे.

फसवणूकदाराने दावा केला आहे कि जॅकलिनसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता, पण जॅकलिनच्या टीमने याचा इन्कार केला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ईडी द्वारे जॅकलीनला या प्रकरणामध्ये आरोपी बनवल्यानंतर तिच्या वकिलाने आपल्या वक्तव्यामध्ये म्हंटले कि जॅकलिनला अजून तक्रारीची अधिकृत प्रत मिळालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जॅकलिनच्या वकिलाने हवाला देत लिहिलं आहे कि आम्हाला फक्त मिडियामधून प्रवर्तन निदेशालय द्वारा दाखल केलेल्या तक्रारीची माहिती मिळाली आहे. प्रवर्तन निदेशालय किंवा माननीय न्यायालयाकडून कोणताही अधिकृत संवाद झालेला नाही. माझ्या क्लायंटला प्रवर्तन निदेशालय द्वारे दाखल केलेल्या तक्रारीची कोणतीही प्रत मिळाली नाही. तथापि जर हि माहिती खरी असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे कि माझ्या क्लायंटला या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून सादर करण्यात आले आहे.

Leave a Comment