फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीला सुंदर दिसण्यासाठी खूप दबाव असतो आणि त्या यासाठी काहीही करण्यास देखील तयार असतात असे अभिनेत्री इशा गुप्ताने सांगितले आहे. प्रकाश झाची वेबसिरीज आश्रम ३ मध्ये पाहायला मिळत असलेली इशा गुप्ताने नुकते एका मुलाखतीमध्ये आपल्या करियरच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल सांगितले आहे.
इशा गुप्ताने खुलास केला कि तिची स्कीन गोरी दिसावी म्हणून तिला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला गेला होता. इतकेच नाही तर नाकाची सर्जरी देखील करून घेण्यास सांगितले होते. एक वेळ अशी स्थिती देखील आली कि इशा गुप्ताने या इंजेक्शनची किंमत जाणून घेण्यासाठी अनेक चक्करा माराव्या लागल्या होत्या.
इशा गुप्ताने २०१२ मध्ये जन्नत चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. डेब्यूनंतर इशाने चक्रव्यूह, राज थ्रीडी, बादशाहो आणि रुस्तम सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. एका मुलाखतीदरम्यान इशा गुप्ता सुरुवातीच्या दिवसांमधील स्ट्रगलबद्दल सांगताना म्हणाली कि, मला सल्ला दिला गेला कि मी माझे नाक शार्प करून घ्यावे.
माझे नाक गोल आहे असे मला सांगितले गेले. मला हा देखील सल्ला दिला गेला होता कि गोरा रंग करून घेण्यासाठी मी इंजेक्शन घ्यावे. मी त्यावेळी थोडी गोंधळून देखील गेले होते मी त्या इंजेक्शनची किंमत देखील जाणून घेतली आणि त्याची किंमत होती ९ हजार रुपये.
इशा गुप्ता पुढे म्हणाली कि, अभिनेत्रींवर सुंदर दिसण्याचा दबाव असतो. मी माझ्या मुलीला कधी अभिनेत्री बनू देणार नाही नाहीतर तिला खूपच कमी वयामध्ये सुंदर दिसण्याचा दबाव झेलावा लागेल. तिने एक सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगावे. माझ्या मुलीने एथलीट बनावे जेणेकरून तिला जास्त अभ्यास देखील करावा लागणार नाही.
अभिनय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी इशा लॉचे शिक्षण घेत होती. पण आईला कँसर झाल्यानंतर तिला शिक्षण अपूर्ण सोडून भारतामध्ये परत यावे लागले. परत आल्यानंतर इशाने शिक्षण पूर्ण न करता बॉलीवूडमध्ये एंट्री केली. तिचा पहिला चित्रपट २०१२ मध्ये प्रदार्षित झाला होता. २००७ मध्ये इशाने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता.
View this post on Instagram