आपल्या देशामध्ये एकापेक्षा एक मोठ मोठे व्यावसायिक आहेत जे नेहमी चर्चेमध्ये राहतात, या उद्योगपतींच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील नेहमी चर्चेमध्ये राहतात. भारतातील टॉप उद्योगपतींच्या पत्नी देखील स्टाईलच्या बाबतीत मागे राहणाऱ्या नाहीत. ज्या आपल्या स्टाईलिश अंदाजाने नेहमी चर्चेमध्ये राहतात. चला तर जाणून घेऊया या उद्योगपतींच्या सुंदर पत्नींबद्दल ज्या एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाहीत.
नीता अंबानी: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानीची एक वेगळी ओळख आहे. आपल्या सामाजिक कार्यांसोबत मिस अंबानी फॅशन आणि स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. मग त्यांच्या घरचे फंक्शन असो, रेड कार्पेट अपीयरेंस असो किंवा इतर कोणताही इवेंटसाठी कुठे जायचे असेल, नीता अंबानी नेहमी एकापेक्षा एक क्लासी लुकमध्ये पाहायला मिळते.
मौरीन वाडिया: वाडिया ग्रुपचे चेयरमन नुस्ली वाडियाची पत्नी मौरीन वाडियाच्या लाईफला सुरुवातीला भलेहि सिंड्रेलाची स्टोरी मानले गेले, पण तिने ज्याप्रकारे ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपले नाव बनवले, त्याद्वारे तिने कौतुक मिळवण्यासोबतच एक प्रेरणा देण्याचे देखील काम केले. ग्लॅमर मॅगझिनची हेड आणि प्रसिद्ध ब्युटी पैजन्टच्या ऑर्गनाइजर्समधील एक मौरीन आपल्या पतीच्या बिजनेसमध्ये देखील वेळोवेळी सहयोग करताना पाहायला मिळते. ती टॉप व्यावसायिकांच्या त्या पत्नींपैकी एक आहे जिची ओळख फक्त पतीच्या नावावरून नाही आहे.
दिव्या खोसला कुमार: टी-सीरीजचे मालक भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारला सर्वात स्टाईलिश म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. बेबी फेसची मालकीण या अॅक्ट्रेस अँड कॉर्पोरेट जायंटच्या वाईफला बोल्ड वेस्टर्न क्लोथ्स पासून ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये देखील स्पॉट केले गेले आहे. इतकेच नाही तर दिव्या अनेक वेळा रॅम्प वॉक करताना देखील पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टाईलिश पाहायला मिळाली आहे.
नताशा पूनावाला: जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची सीईओ आदर्श पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला फॅशन एन्थूज़ीऐस्ट म्हणून ओळखली जाते. ती जगातील टॉप डिजाइनर्सच्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी पाहायला मिळत असते. तसे फक्त फॅशन लव्हर म्हणून नाही तर नताशा समाज सेवी कंपनीमध्ये एग्जिक्युटिव डायरेक्टर विल्लो पूनावाला फाऊंडेशनची चेयरपर्सन, नेदरलँड्समध्ये पूनावाला सायन्स पार्कची डायरेक्टर म्हणून देखील ओळखली जाते.
ईशा अंबानी: नीता अंबानीप्रमाणे तिची मुलगी इशा अंबानी देखील आपल्या फॅशन आणि स्टाईलमुळे देखील चर्चेमध्ये राहते. इशा अंबानी भारतातील नामी पीरामल घराची सून आहे. तिचे पती आनंद पीरामल कंपनीमध्ये एग्जिक्युटिव डायरेक्टरच्या पदावर आहेत. इशा नेहमी कमालीच्या वेस्टर्नपासून ट्रडिशनल वेअरमध्ये स्पॉट होत असते.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या ग्लॅमरस पत्नी, ज्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रीला देखील देतात टक्कर !
By Viraltm Team
Updated on: