बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सध्या मालदीवमध्ये पती विक्की कौशलसोबत बर्थडे व्हेकेशन एन्जॉय करत आहे. कॅटरीना तिचा ३९ वा बर्थडे साजरा करत आहे. यादरम्यानचे तिने काही सुंदर फोटो सोशल मिडियावरून शेयर केले आहेत. व्हेकेशनचे फोटो समोर येताच कॅटरीना कैफच्या भावाच्या रिलेशनबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. वास्तविक व्हेकेशन दरम्यानचे असे काही फोटो समोर आले आहेत कि ज्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत कॅटरीनाच्या भावाचे रिलेशन चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रत्येकजण या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे जी कॅटरीना कैफची वहिनी बनणार आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडमध्ये सर्वात हॉ ट अभिनेत्री इलियाना डिक्रूज आहे. इलियाना कॅटरीनाच्या बर्थडेमध्ये सामील होण्यासाठी तिच्यासोबत मालदीवमध्ये आहे. यासोबत कॅटरीनाचा भाऊ सैबेस्टिन देखील तिथे उपस्थित आहे. सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये इलियाना आणि सेबॅस्टिन दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हा फोटो इलियानाने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे जो सध्या खूपच व्हायरल होत आहे. फोटो समोर येताच इलियाना आणि सैबेस्टियनच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. बर्फी, रुस्तम आणि मैं तेरा हीरो फेम अभिनेत्री इलियाना डिक्रूज ब्रेकअप नंतर आता पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे.
इलियाना डिक्रूज सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण ती आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये राहते. इलियाना सोशल मिडियावर आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. कॅटरीनाचा भाऊ मुंबई आणि राजस्थानमध्ये आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये दिसला होता. असे देखील म्हंटले जाते कि इलियाना आणि सैबेस्टियन गेल्या सहा महिन्यापासून रिलेशनमध्ये आहेत.