सलमान खानवर फिदा झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ मधील रीटाचा इतका बदलला आहे लुक, आता दिसते अशी…

By Viraltm Team

Published on:

दरवर्षी चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्री आपले नशीब अजमावण्यासाठी येत असतात. यामधील काही अभिनेत्री सफल होतात तर काही गुमनामीमध्ये हरवून जातात. अशीच एक अभिनेत्री आहे साहिला चड्ढा जिने ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होये पण आज देखील ती एक गुमनामी अभिनेत्री म्हणून राहत आहे.

माहितीनुसार साहिलाच्या पॅरेंट्सचा मृत्यू तेव्हाच झाला होता जेव्हा ती छोटी होती. साहिलाचे वडील चित्रपट दिग्दर्शक होते तर आई राजस्थानच्या एका राजघराण्याशी संबंधीत होती. असे म्हंटले जाते कि साहिलाने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षा पासूनच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. साहिलाने मिस इंडियाचा किताब देखील जिंकला आहे.

साहिलाच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे झाले तर तिने फक्त हिंदीच नाही तर अनेक रिजनल भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. साहिलाचा सर्वात चर्चित चित्रपट सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर हम आपके हैं कौन होता हा चित्रपट १९९४ मध्ये रिलीज झाला होता आणि त्यावेळी तो खूपच सुपरहिट झाला होता.

चित्रपटामध्ये साहिलाने रीटा नावाच्या मुलीची भूमिका केली होती. जी प्रेम म्हणजेच सलमान खानवर फिदा होती आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छित होती. चित्रपटामध्ये साहिलाने उत्कृष्ट अभिनय केला होता आणि तिची भूमिका दर्शकांना खूप आवडली होती. तथापि तेव्हाची साहिला आणि आताची साहिला यामध्ये खूप फरक झाला आहे.

तुम्ही साहिलाचा लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखू देखील शकणार नाही कि हि तीच अभिनेत्री आहे. जिने हम आपके हैं कौन चित्रपटामध्ये रीटाची भूमिका केली होती. साहिला आता चित्रपटांपासून दूर आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ती तिचा पती अभिनेता निमाई बालीसोबतच्या भांडणांमुळे चर्चेमध्ये आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sahila Chaddha (@sahilachaddha)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment