अभिनेता हृतिक रोशनचा फिटनेस पाहून आपल्याला हे लक्षात येते कि तो फिटनेसकडे किती लक्ष देतो. इतकेच नाही तर हृतिक रोशनची आई पिंकी रोशनला देखील फिटनेसचे खूप वेड आहे. जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून हृतिक रोशनच्या आईने पाण्यामध्ये योगासनांचे प्रकार केले.
हृतिकची आई पिंकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पाण्यामध्ये योगा करतानाचे व्हिडीओ शेयर केले आहेत. शेयर केलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. हृतिकची आई ६७ वर्षांची असून वयाची साठी ओलांडून देखील बॉलीवूड अभिनेत्रींना देखील ती फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते.
शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये पिंकीसोबत तिचे प्रशिक्षक देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुचनेनुसार ती पाण्यामध्ये योगा करत आहे. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला असून हजारो लोकांना पाहिला आहे.
त्याचबरोबर हृतिकच्या आईच्या जिद्दीचे आणि फिटनेसचे लोक कौतुक देखील करत आहेत. हा व्हिडीओ महिलांसाठी खरेच प्रेरणादायी आहे. व्हिडीओ सोबत पिंकीने योगा करतानाने काही फोटो देखील शेयर केले आहेत.
अभिनेता हृतिकला फिटनेससाठीची प्रेरणा त्याच्या आईकडूनच मिळाली असेल. कारण व्हिडीओमध्ये पिंकी फक्त योगा करतानाच नाही तर बॉक्सिंग करताना देखील पाहायला मिळत आहे. तरुणांना देखील लाजवणारी एनर्जी त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
हृतिकच्या आईचे फिटनेससाठीचे प्रेम खरेच कौतुक करण्याजोगे आहे. सध्या पिंकीच्या या व्हिडीओची सोशल मिडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अभिनेता हृतिक रोशनदेखील आईच्या या व्हिडीओवर कमेंट करून तिचे कौतुक करण्यास विसरला नाही.