फोटोमध्ये दिसत असलेली तीन स्टार्स आहेत बालपणीचे जिगरी मित्र, एक तर आहे बॉलीवूडमधील सुपरस्टार, तुम्ही ओळखले का…

By Viraltm Team

Published on:

जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये पाहायला मिळालेले फरहान अख्तर आणि ऋतिक रोशन ज्याप्रकारे चित्रपटामध्ये एकमेकांचे डोंस्त बनलेले दिसले त्याचप्रमाणे रियल लाईफमध्ये देखील हे दोघे बालपणीचे जिगरी मित्र आहेत. इतकेच नाही तर धूम सारख्या चित्रपटामध्ये काम केलेल्या उदय चोप्राचे देखील बालपणीचे मित्र आहेत. तिघांचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उदय चोप्रा, ऋतिक रोशन आणि फरहान अख्तर मस्ती करताना पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 9XJalwa (@9xjalwa)

कहो ना प्यार है मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारा ऋतिक रोशनची फिल्मी बॅकग्राउंड आहे. ठीक त्याचप्रकारे जावेद अख्तर आणि शबाना आजमीचा मुलगा फरहान अख्तर आणि प्रसिद्ध दिवंगत दिग्दर्शक आणि निर्माता यश चोप्राचा मुलगा उदय चोप्रा आहे. हे तिघेही फिल्मी बॅकग्राउंडचे आहेत. अशामध्ये लहानपणापासून देखील त्यांची चांगली बॉन्डिंग आहे. असे आपण उगाच म्हणत नाही आहोत फोटोमध्ये पाहून देखील तुम्ही हेच म्हणाल कि हे बालपणीचे चड्डी दोस्त आहेत. या फोटोमध्ये एका बाजूला फरहान अख्तर कुरळ्या केसांमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे उदय चोप्रा पिवळ्या रंगाची टोपी घातलेला दिसत आहे. या दोघांमध्ये ऋतिक रोशन सुंदर स्माईल देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Media Blooms (@mediablooms)

ऋतिक रोशनच्या वाढदिवसाच्या प्रसंगी फरहान अख्तरने त्यांचा हा फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये ऋतिक फरहानच्या खांद्यावर हात ठेऊन पोज देत आहे. फोटो शेयर करत फरहानने लिहिले होते कि तुझे बायसेप्स माझ्या बायसेप्सपेक्षा मोठे कसे आहेत? हा फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की हृतिकला लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेता फरहान खानने अभिनेत्री आणि वीजे शिबानी दांडेकरसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नामध्ये ऋतिक आणि फरहानने आपल्या सेनोरिटा या आयकॉनिक गाण्यावर दमदार परफॉर्मन्स दिला होता. जो पाहिल्यानंतर चाहत्यांना जिंदगी ना मिलेगी दोबाराची आठवण झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

ऋतिक, फरहान आणि उदयच्या प्रोफेशनल करियरबद्दल बोलायचे झाले तर ऋतिक रोशनने २००० मध्ये कहो ना प्यार है चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर त्याने धूम २ मध्ये उदय चोप्रा आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये फरहान अख्तरसोबत काम केले. तर फरहान अख्तर एक उत्कृष्ट अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो सिंगर, रायटर आणि निर्माता आहे. उदय चोप्राने धूम सारख्या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. तथापि गेल्या काही काळापासून तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे पण तो आपल्या वडिलांच्या कंपनीमध्ये एक दिग्दर्शक म्हणून काम करतो.

Leave a Comment