फुफ्फुस आणि घशाच्या इन्फेक्शनचे घरगुती इलाज, ऑक्सिजन लेवल देखील वाढते !

By Viraltm Team

Published on:

आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे कि फुफ्फुस मजबूत करण्यासाठी थोडी मुलेठी, १-२ काळी मिरची, १-२ लवंग शेकून आणि ४-५ तुळशीची पाने, थोडीशी मिश्री आणि थोडी दालचिनी घेऊन ती हळू हळू चघळावी. दम्याच्या रुग्णांसाठी हा घरगुती उपाय खूपच लाभदायक आहे. फुफ्फुसातील संक्रमण दूर करते आणि यामुळे ऑक्सिजन लेवल देखील वाढते. दम्याच्या रुग्णांनी दररोज नियमित रूपाने याचे सेवन केले तर याचा परिणाम पाहायला मिळतो.

मुलेठीचे विशेष तत्व आणि औषधी गुणधर्म :- औषधी गुणांनी परिपूर्ण मुलेठीमध्ये व्हिटॅमिन बी, ई तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, कोलीन, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिकॉन, प्रथिने, ग्लिसरिक अॅसिड सोबत अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बायोटिक गुणधर्म आढळतात. जे सर्दी-ताप सोबत फुफ्फुसांना मजबूत ठेवण्यास मदत करते. मुलेठीचे सेवन ३-५ ग्रॅम पावडरच्या मात्रामध्ये करावे.

तुळशीच्या पानांचे विशेष तत्व आणि औषधी गुण :- तुळशीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न, पोटॅशियम, क्लोरोफिल मॅग्नेशियम, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी आढळते. जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी ४-५ तुळशीच्या पानांचे सेवन करावे. हे लक्षात ठेवा कि जर तुमचे दाट मजबूत नसतील तर तुळशीच्या पानांना दातांनी चघळू नये. दातांसाठी हे हानिकारक होऊ शकते.

लवंगची वैशिष्ट्ये आणि औषधी गुणधर्म :- लवंग अनेक गुणांनी परिपूर्ण असते. लवंगमध्ये युजिनॉल नावाचे तत्व आढळते ज्यामुळे स्ट्रेस, पोटासंबंधी समस्या, पार्किन्सन, अंगदुखी सारख्या समस्यांमध्ये लाभ मिळतो. लवंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांव्यतिरिक्त व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, रीबोफ्लाव्हिन, व्हिटॅमिन ए, थायमिन आणि व्हिटॅमिन डी, ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखे तत्व आढळतात. हृदय, फुफ्फुसे, यकृत इत्यादीना मजबूत करण्यासोबत पाचन तंत्र दुरुस्त करण्यास देखील मदत करते.

दालचिनीचे विशेष तत्व आणि औषधी गुणधर्म :- फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो. दालचिनी चवीला थोडी गोड आणि तिखट असते. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थायमिन, फॉस्फरस, प्रथिने, सोडियम, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, नियासिन, कर्बोदके इत्याधी आढळतात. याशिवाय याला अँटी-ऑक्सीडंट्सचा चांगला स्रोत मानले जाते. जे आपल्या हृदयाला मजबूत ठेवते.

काळी मिरचीचे तत्व आणि औषधी गुणधर्म :- काळ्या मिरचीमध्ये मुख्य रूपाने अँटी-फ्लॅटुलन्स, ड्यूरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, डाइजेस्टिव, मेमरी इनहेंसर आणि पेन रिविलर गुण आढळतात. काळी मिरची मुख्य रूपाने गळ्याचे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. काळ्या मिरचीमध्ये निहित पिपेरीने नावाचा एक यौगिक, व्हिटॅमिन ए आणि सी, सेलेनियम, बीटा कॅरोटीन सारखे पोषक तत्वांची जैव-उपलब्धता वाढवते, ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment