बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या प्रोफेशन लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये असतो. शाहरुखने आपली लहानपणीची मैत्रीण गौरी छिब्बर सोबत लग्न केले होते.

गौरी तीच मुलगी आहे जिला पहिल्यांदा पाहिल्यानंतर शाहरुख तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने निश्चय केला होता कि लग्न केले तर तिच्यासोबतच करेन. तेव्हा कुठे गौरी शाहरुखची पत्नी बनली होती. पण सुहागरात्रीच्या दिवशी असे काही झाले होते कि शाहरुखला गौरीसोबत नाही तर हेमा मालिनीसोबत सु हा’ग’रात्र घालवावी लागली होती.

वास्तविक शाहरुखने आपल्या करियरच्या सुरुवातीमध्येच गौरीसोबत लग्न केले होते. यादरम्यान तो प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीच्या दिल आशना है चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करत होता आणि इकडे त्याने गौरीसोबत लग्न केले होते.

दिल आशना है हा शाहरुखच्या फिल्मी करियरचा पहिला चित्रपट होता. अशामध्ये त्याच्यासाठी हा चित्रपट खूपच महत्वाचा होता. त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान करायचे नव्हते. अशामध्ये त्याने गौरीसोबत लग्न केल्यानंतर तिला तो मुंबईला घेऊन आला होता.

त्यावेळी शाहरुखकडे राहण्यास्ठी घरदेखील नव्हते. अशामध्ये त्याच्या जवळचा मित्र अजीज मिर्जाने त्याच्यासाठी एक हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. जेव्हा शाहरुख आपल्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने हेमा मालिनीला सांगितले कि तो मुंबईला आला आहे.

जेव्हा हेमा मालिनीला समजले तिने लगेच शाहरुखला शुटींगसाठी बोलावून घेतले. तर शाहरुखला देखील मनाई करता आली नाही. यानंतर शाहरुख आपल्या नवीन नवरी गौरीला घेऊन चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. जिथे गौरीला एका वेगळ्या रूममध्ये बसवले गेले होते आणि इकडे शाहरुख रात्रभर हेमा मालिनीसोबत शुटींग करत होता.

गौरी खान शाहरुख खानची वाट बघत संपूर्ण रात्र तिथेच बसून होती. माहितीनुसार शाहरुख खानने सुहागरात्रीच्या दिवशी २ वाजेपर्यंत काम केले होते आणि जेव्हा तो पत्नी गौरी खानजवळ पोहोचला तेव्हा ती त्याची वाट बघून खुर्चीवरच झोपली होती. असे म्हंटले जाते कि पत्नीला अशा अवस्थेमध्ये बघितल्यानंतर तो रडू लागला होता.

एका मुलाखती दरम्यान स्वतः शाहरुख खानने हा किस्सा शेयर केला होता. त्याने म्हंटले होते कि मला माझ्या सुहागरात्रीच्या दिवशी खूप रडू आले होते कारण हा दिवस त्याच्यासाठी आणि गौरीसाठी खूपच अपमानास्पद होता. गौरीला संपूर्ण रात्र मच्छरांमध्ये घालवावी लागली. जेव्हा चित्रपटाची शुटींग संपली तेव्हा तो गौरीजवळ आला आणि तिने काहीही म्हंटले नाही तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते.

शाहरुख खान आणि गौरी खानने २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आर्यनचा जन्म झाला आणि नंतर मुलगी सुहाना खान आणि शेवटी अबराम खानचा जन्म झाला. शाहरुख आणि गौरीची मुले पॉपुलर स्टार किड्सपैकी एक आहेत. शाहरुख खान लवकरच पठान चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणदेखील त्याच्यासोबत पाहायला मिळणार आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.