Sholay Movie आपण सर्वांनी शोले चित्रपट तर नक्कीच पाहीला असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि या चित्रपटामध्ये ठाकूरची भूमिका साकारलेले संजीव कुमार (Sanjeev Kumar) आणि बसंती हेमा मालिनी (Hema Malini) एकत्र एकाही सीनमध्ये का दिसले नाहीत. दोघे एकाच गावातील असतात. बसंती जय-वीरूला ठाकूरच्या घरी पोहोचवते. परंतु चित्रपटामध्ये कुठेही ठाकूर म्हणजेत संजीव कुमार बसंतीचे नाव सुद्धा घेत नाही. हि खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यामागील कारणहि तितकेच मनोरंजक आहे.
हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्या अफेयरच्या चर्चा ७० च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. असेही म्हंटले जाते कि संजीव कुमार हेमा मालिनीला मागणी घालण्यासाठी तीच्या घरीदेखील गेले होते. परंतु हेमा मालिनीच्या आईने याला साफ नकार दिला होता. तरीही संजीव कुमारने प्रयत्न नाही सोडले आणि त्यांनी आपला चांगला मित्र जितेंद्रकडे लव लेटर हेमा मालिनीकडे पाठवले.जितेंद्र स्वतः हेमा मालिनीसाठी वेडा होता. त्यांनी संजीव कुमारचे लव लेटर हेमा मालिनीला आपल्या नावाने दिले. हेमा मालिनीची आई संजीव कुमारच्या त्रासापासून मुक्त करू इच्छित होती. यासाठी त्यांनी धर्मेंद्रला हेमा मालिनीच्या जवळ जाण्यास सांगितले.
पण जेव्हा धर्मेंद्रच हेमा मालिनीवर आपला अधिकार दाखवू लागला तेव्हा हेमाच्या आईची आणखी डोकेदुखी वाढली. तेव्हा जितेंद्रने हेमासोबतच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्या आईसमोर मांडला. हेमाची आई या लग्नासाठी तयार झाली आणि तिने हेमाला देखील यासाठी तयार केले.अशी बातमी समोर आली होती कि जितेंद्र पंडित आणि पाहुण्यांसोबत हेमाच्या घरी वरात घेऊन गेला होता. जेव्हा धर्मेंद्रला हि गोष्ट समजली तेव्हा तो खूप संतापला आणि तिथे पोहोचला. इकडे जितेंद्रची होणारी बायको देखील हेमाच्या घरी पोहोचली. अशाप्रकारे जितेंद्र आणि हेमाचे लग्न मोडले.
त्यानंतर संजीव कुमारने (Sanjeev Kumar) एक दिवस शोलेच्या सेटवर हेमा मालिनीला प्रपोज केले. जेव्हा हि गोष्ट धर्मेंद्रला कळाली त्यावेळी तो संतापला आणि रमेश सिप्पी यांना जाऊन म्हणाला कि त्यांनी चित्रपटामध्ये असा कोणताही सीन करून नये कि हेमा आणि संजीव कुमार एकत्र येतील. संजीव कुमार हेमाच्या उत्तराची वाट पाहत राहिला आणि धर्मेंद्रने बाजी मारली.