खूपच चमत्कारी आहे अमृत वेल, ना स्वतः मारते आणि ना मरू देते, कोरोनाच्या काळात या आजारावर आहे फायदेशीर !

By Viraltm Team

Published on:

आयुर्वेदामध्ये गीलोयला अमृत वेल देखील म्हंटले जाते. कारण आहे ना स्वतः मरते ना हि याचे सेवन करणाऱ्याला कोणताहि रोग होऊ देते. गीलोयचे सेवन कोणत्या वयाच्या व्यक्तीने केले जाऊ शकते. हि चमत्कारी औषधी अतिसार, डेंग्यू आणि कर्करोग सारख्या गंभीर आजारातही फायदेशीर ठरते.

गीलोय एक बहुवर्षीय वेल असते. याची पाने खायच्या पानासारखी असतात आणि फळे मटरच्या दाण्याप्रमाणे असतात. गीलोयची पाने चवीला थोडे तिखट असतात. आयुर्वेदामध्ये तापाची महान औषधी मानले जाते आणि याला जीविका असे देखील नाव दिले गेले आहे. गीलोय पचण्यासाठी खूप सोपी असते. भूख वाढते आणि डोळ्यांसाठी देखील लाभदायक असते.

गीलोयचे फायदे
ज्वरनाशक :- गीलोयच्या तत्वामध्ये ज्वरनाशक क्षमता असते. ज्वरच्या वेळी गीलोयचा रस पिल्याने आराम मिळतो. हे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी देखील खूप मदत करते. ज्यामुळे ज्वर येण्याची संभावना खूप कमी होते.

पाचन क्षमता :- त्रिफळाबरोबर जर गीलोयचा देखील वापर केला तर पाचन तंत्रासंबंधी विकारांमध्ये याचा खूप लवकर फायदा मिळतो.

रक्त शुद्ध करते :- गीलोयमध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात जे आपल्या रक्ताला साफ करण्यास मदत करतात आणि त्याला निरोगी बनवण्यासाठी मदत करतात.

मानसिक तणाव कमी करते :- तणावाने प्रत्येकाचे आयुष्य प्रभावित होते, यामुळे तणावामधून मुक्त होण्यासाठी गीलोय खूप लाभदायक ठरते. गीलोयच्या सेवनाने आपण तणाव कमी करू शकतो. याचे मुख्य कारण हे आहे यामध्ये अढळणारे अॅेडाप्टोजेनिक घटक. आयुर्वेदानुसार हे शरीरामधील असे घटक बाहेर काढते जे मानसिक तणावाचे कारण बनतात. आयुर्वेद टॉनिकमध्ये याचा वापर मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. याचे चूर्ण मधामध्ये मिसळून घेतल्याने मेंदूशी संबंधित आजारांना मदत होते.

त्वचेसाठी गीलोयचा उपयोग :- गीलोयचा उपयोग त्वचेसंबंधी रोगांना आळा घालण्यासाठी देखील होतो. त्वचेच्या संसर्गजन्य रोगांमध्ये गीलोय उपयोगी ठरते. गीलोयच्या वापरामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. असे यामध्ये आढळणाऱ्या अँटी-एजिंग प्रॉपर्टीजमुळे होते.

कर्करोगात गिलोय उपयोगी :- गीलोयमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे शरीरामधील फ्री रेडिकल्स शरीराबाहेर काढण्यास मदत करतात. गीलोयसोबत तुळशी, कडुनिंब आणि गहू किंवा ज्वारीचा स्वरस घेतला तर कर्करोगाचा फैलाव रोखण्यात फायदेशीर ठरू शकते.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment