हार्दिक-नताशाने लग्नामध्ये केली रॉयल एंट्री, व्हिडीओ झाला व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविचसोबत विवाहबंधनात अडकला आहे. या कपलने राजस्थानच्या उदयपुरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्नाच्या दरम्यान या कपलने रॉयल एंट्री केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक आणि नताशाने स्टेजवर रॉयल एंट्री केली. यादरम्यान हार्दिक पांड्या ब्लॅक सूट, व्हाईट शर्ट, बो टाई आणि टिंटेड ग्लासमध्ये पाहायला मिळाला. तर नताशा रॉयल व्हाईट वेडिंग गाऊनमध्ये दिसली. कपलने एकमेकांचे हात पकडून डांस करत रॉयल एंट्री केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या शाही लग्नामध्ये दोघांचे खास मित्र आणि नातेवाईक सामील झाले होते. पार्टीची थीम ब्लॅक अँड व्हाईट आणि पिंक होती. उपस्थिती पाहुणे देखील या थीमनुसार कपडे घालून आलेले पाहायला मिळाले. हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान हिंदू रितीरिवाजाने लग्न केले होते माहिती नुसार नताशा त्यावेळी प्रेग्नंट होती. या लग्नाची खास गोष्ट हि होती कि लग्नामध्ये नताशा-हार्दिकचा तीन वर्षाचा मुलग अगस्त्य देखील सामील झाला होता. हार्दिकने १४ फेब्रुवारी रोजी नताशासोबत पुन्हा लग्न केले. हार्दिक पांड्याने तीन वर्षांपूर्वी ३१ मे २०२० रोजी नताशा सोबत लग्न केले होते.

त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेयर करताना लिहिले आहे कि प्रेमाच्या या बेटावर आम्ही तीन वर्षांपूर्वी दिलेल्या पुनरावृत्ती करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आमच्यासोबत हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी कुटुंब आणि मित्र उपस्थित राहिल्याने आम्ही खरोखरच धन्य आहोत. हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो नताशाला पहिल्यांदा एका नाईट क्लबमध्ये भेटला होता.

त्यावेळी त्याची पत्नी नताशाला हे माहित नव्हते की, हार्दिक भारतीय टीमकडून खेळतो. १ जानेवारी २०२० रोजी, हार्दिकने नताशाला बीच क्रूझवर गुडघ्यावर बसून सिनेमॅटिक अंदाजामध्ये प्रपोज केले होते. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांना एक मुलगा आहे. दोघांनी आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे, त्याचा जन्म ३० जुलै २०२० रोजी झाला होता.

तीन वर्षाच्या अगस्त्यने आईवडिलांच्या लग्नात खूप धमाल मस्ती केली. हार्दिक पांड्याने शेयर केलेल्या लग्नाच्या फोटोमध्ये मुलगा देखील पाहायला मिळत आहे. या लग्नासाठी नताशाने फॅशन डिझायनर्स शांतनु आणि निखिल यांनी डिझाइन केलेला पांढरा गाऊन कॅरी केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

नताशाचा फ्लोअर लेन्थ वेडिंग गाऊन बनवायला अनेक तास लागले होते. यामुळेच तिच्या गाऊन प्रत्येक डीटेल्स खूपच खास होती. गाऊनच्या वरच्या भागाला कॉर्सेट पॅटर्नमध्ये फिट केले गेले होते आणि शीयर फॅब्रिकला स्लिट्ससोबत स्कर्टमध्ये जोडले होते. स्लीव्सवर मोत्यांसोबत N आणि H अक्षर जोडले होते ज्याची माहिती स्वतः डिझाइनरने दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Leave a Comment