पत्नी शालिनीला घटस्फोट देणे हनी सिंहला पडले महागात, पोटगीसाठी मोजावी लागली इतकी मोठी रक्कम…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड गायक आणि रॅपर हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे १० वर्षे जुने लग्न मोडले आहे. हनी सिंह आणि शालिनी तलवार यांनी २३ जानेवारी २०११ रोजी दिल्ली स्थित एका गुरुद्वारामध्ये सिख रीति-रिवाजाने लग्न केले होते. लग्न इतके सिक्रेट होते कि तीन वर्षानंतर दोग्नाच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या.

आता शालिनी तलवारने हनी सिंहवर गंभीर आरोप लावत गेल्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज कोर्टामध्ये दाखल केला होता. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि शालिनीने घटस्फोटाच्या बदल्यात १० करोड रुपयांची मागणी केली पण तिला त्यापेक्षा कमीच मिळाले.

कोरोना व्हायरसच्या काळात शालिनीने तिचा एक्स पती हनी सिंगवर मारहाण-घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत अवैध संबंध असे अनेक गंभीर आरोप केले होते. दिल्लीच्या साकेत डिस्ट्रिक कोर्टच्या फॅमिली कोर्टने आता हनी सिंह आणि शालिनीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. पण तिला १ करोड रुपयांवर संतुष्ट राहावे लागले आहे. हे पैसे तिला चेक स्वरूपामध्ये एका सील्ड पाकीटामध्ये देण्यात आले. हनी सिंह आणि शालिनी जवळजवळ २० वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २०११ मध्ये लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले.

शालिनीने सासरा आणि पती हनी सिंहच्या वडिलांवर देखील चुकीच्या प्रकारे स्पर्श करण्याचा देखील आरोप लावला आहे. आपल्या तक्रारीमध्ये तिने हनी सिंहच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हनी सिंहवर आरोप लावत शालिनीने दावा केला आहे कि लग्नानंतर देखील हनी सिंहचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते.

शालिनीने २०२१ मध्ये दिल्लीच्या तीस हजारी कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यासोबत तिने हनी सिंहला नुकसानभरपाई म्हणून सुमारे १० कोटी रुपयांची मागणी केली होती. शाळेत शिकत असताना दोघांची भेट झाली होती.

Leave a Comment