शहनाज गिलचा निरागसपणा सगळ्यांची मनं जिंकत असतो. सामान्य लोकांपासून ते खास लोकांपर्यंत तिच्या जीव ओवाळून टाकत असतात. अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये गुरु रंधावाचे नाव देखील जोडले गेले आहे, ज्याने शहनाज गिलसोबत एक व्हिडीओ शेयर केला आहे. दोघेहि समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट करताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकार हसत संभाषण करताना दिसत आहेत. अशी देखील वेळ आली जेव्हा गुरु रंधावा देखील शरमेने लाल झाला होता, तेव्हा शहनाज त्याला आपल्याकडे पाहायला सांगते. दोघांच्या केमेस्ट्रीला चाहत्यांना क्युट म्हंटले आहे. वास्तविक शहनाजने जेव्हा गुरुला तिच्या गुडघ्यावर हात ठेवण्यासाठी सांगितले तेव्हा तो तिचे पाय झाकू लागतो.
पण शहनाज आपला पाय पुन्हा एक्सपोज करते आणि गुरु रंधावाला तिच्याकडे पाहण्यासाठी सांगते. यानंतर गुरु रंधावा ज्या प्रकारे शरमेने लाल होतो त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. हि बाब चाहत्यांना जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
एका युजरने पंजाबीमध्ये लिहिले आहे कि तुम्हीज दोघे खूपच क्युट दिसत आहात, लग्न करा. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि दोन प्रेमी एकत्र, तिसऱ्या एका युजरने गुरु खूपच पॉजिटिव वाटत आहे, तर शहनाज तर काही सांगूच नका तिने तर लाखो लोकांचे मन जिंकले आहे असे लिहिले आहे.
गुरु रंधावाने व्हिडीओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले की तुला फक्त शहनाजकडे पाहण्याची परवानगी होती, चाहते कमेंट करून त्यांच्या नवीन गाण्याबद्दल खूपच उत्सुक झाले आहेत. गुरुने पीच शर्टवर कोट आणि पँट घातली आहे तर शहनाज लाल रंगचा ड्रेस घालून मोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram