अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या गुरु चित्रपटामध्ये पाहायला मिळालेला अभिनेता आणि फिल्ममेकर प्रतापचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. असे म्हंटले जाते आहे कि शुक्रवारी सकाळी चेन्नई येथील त्यांच्या राहत्या घरी ते मृत अवस्थेत आढळून आले.
मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, पण माहिती नुसार ते अनेक दिवसांपासून आजाराचा सामना करत होते यामुळेच त्यांचे निधन झाल्याचे म्हंटले जात आहे. प्रताप पोथेनचे अंतिम संस्कार शनिवारी सकाळी १० वाजता चेन्नईच्या न्यू अवादी रोड स्थित स्मशान भूमीत येणार आहे.
प्रताप पोथेन हे मल्याळम चित्रपटामध्यून प्रसिद्ध चेहरा होते. १९७८ पासून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी मल्याळमशिवाय, तमिळ, तेलगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अरवाम हा त्यांचा पहिला चित्रपट होता जो १९७८ मध्ये रिलीज झाला होता.
ठाकरा, आरोहणं, पनेनीर, पुषपंगल, तनमात्र, २२फीमेल कोट्टयम आणि बैंगलोर डेज हे त्यांचे पॉपुलर मल्याळम चित्रपट आहेत. ममूटी स्टारर CB१५: द ब्रेनमध्ये ते शेवटचे पाहायला मिळाले होते. मणि रत्नमच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या गुरु चित्रपटामध्ये त्यांनी आईएएस ऑफिसर के. आर. मेननची भूमिका केली होती.
त्यांनी इंडस्ट्रीमध्ये अभिनयाशिवाय फिल्म डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि स्क्रिप्ट राइटर म्हणून देखील काम केले. मल्याळम चित्रपटामध्ये काम करताना त्यांना दोन फिल्मफेयरचा बेस्ट अभिनेता पुरस्कार जिंकला होता. त्यांना पहिला फिल्मफेयर १९७९ मध्ये ठाकरा चित्रपटासास्ठी तर दुसरा फिल्मफेयर १९८० मध्ये आलेल्या चमरम चित्रपटासाठी मिळाला होता.
१३ ऑगस्ट १९५२ मध्ये तिरुवंतपुरममध्ये जन्मलेले प्रताप पोथेन त्यावेळी फक्त १५ वर्षाचे होते जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना गमावले होते. त्यांनी ऊटीच्या लवडेल स्थित लॉरेंस स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मद्रास क्रिश्चियन कॉलेजमधून त्यांनी ग्रॅजुएशन केले.
त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात मुंबईमध्ये एका जाहिरात एजेंसीमध्ये कॉपीराइटर म्हणून काम केले होते. प्रताप पोथेनचे लग्न राधिकासोबत झाले होते जे फक्त एकच वर्ष टिकले होते. नंतर त्यांनी आमला सत्यनाथसोबत लग्न केले जे २२ वर्षे टिकले होते. २०१२ मध्ये ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले. प्रताप आणि आमलाला एक मुलगी आहे जिचे नाव काव्या आहे.