चुकुनही झोपण्यापूर्वी करू नका या गोष्टीचे सेवन, कायमची उडेल तुमची झोप !

By Viraltm Team

Published on:

लोक नेहमी ग्रीन टी पिण्याचे फायदे बघत असतात, पण तुम्हाला माहिती आहे का कि चुकीच्या वेळी ग्रीन टी पिल्याने नुकसानदेखील होऊ शकते. होय, चुकीच्या वेळी ग्रीन टी पिल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. ग्रीनटी मध्ये फ्लेवोनोइड मुबलक प्रमाणात असतात जे शरीरातील सूज कमी करण्याचे आणि त्याचबरोबर खराब कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्याचे आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्याचे महत्वाचे काम करतात. लोक नेहमी स्वतःला फिट ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणत्याही वेळी ग्रीन टीचे सेवन करने आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

वास्तविक रात्री ग्रीन टी पिल्याने तुमची झोप प्रभावित होऊ शकते. ज्यामुळे तुमचा दुसरा दिवस पूर्णपणे खराब होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे. ग्रीन टी पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वात उत्तम वेळ असते. ग्रीन टी मध्ये असलेले थीनिन कोर्टिसोल सारखे तणावासंबंधी हार्मोनला कमी करण्याचे काम करतात. हे शरीरामध्ये पोहोचून मेंदूतील न्यूरॉनच्या गतिविधिला आराम देते. ग्रीन टीमध्ये कॉफीच्या तुलनेत कैफीनची मात्र कमी असते.नुकतेच झालेल्या एका रिसर्चनुसार असे समोर आले आहे कि सकाळच्या वेळी ग्रीन टी पिल्याने माणसाला रात्री चांगली झोप येते. अशामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी सकाळी किंवा दुपारी एक दोन कप ग्रीन टी जरूर घ्यावी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर रात्री झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर ग्रीन टी पिण्यापासून दूर राहिले पाहिजे.

Leave a Comment