९ वर्षानंतर जेनेलिया देशमुखचा सणसणीत खुलासा, लोक म्हणाले होते; रितेश सोबत लग्न केल्यानंत तुझे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची बेस्ट जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजाची बाँडिंग अनेकदा चर्चेत असते. जेनेलिया आणि रितेश दोघांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय साऊथ चित्रपटांमध्ये देखील ती पाहायला मिळाली आहे. या दोघांची लव्ह स्टोरी बॉलीवूडच्या सर्वात क्युट लव्ह स्टोरींपैकी एक आहे. एका मुलाखतीमध्ये जेनेलियाने सांगितले होते कि जेव्हा तिने रितेश देशमुखसोबत लग्न केले होते तेव्हा लोकांनी तिला काय म्हंटले होते.

रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी जेनेलिया फक्त १६ वर्षाची होती. शुटींगदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले होते. दोघांनी दोन मुले राहील आणि रियान आहेत.

लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. तथापि मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्रीने पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. वास्तविक जेनेलियाचा इट्स माई लाइफ चित्रपट लग्नानंतर जवळ जवळ ८ वर्षानंतर २०२० मध्ये रिलीज झाला होता. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला हा प्रश्न विचारला गेला होता कि तू अभिनय क्षेत्रामध्ये पुनरागमन करण्यास तयार आहेस का ? यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हंटले होते कि पुन्हा परत आल्यानंतर मी आशा करते कि मला पहिल्यापेक्षा जास्त काम मिळेल.

जेनेलिया पुढे म्हणाली कि मला माहित नाही कि परत आल्यानंतर मला कशाप्रकारच्या भूमिका मिळतील किंवा इंडस्ट्री कशाप्रकारे माझे वेलकम करेल. जेव्हा मी लग्न केले तेव्हा सर्वांना सांगितले होते कि आता मी माझ्या कुटुंबासोबत एंजॉय करणार आहे, कारण याआधी मी खूप काम केले होते, भलेही लोकांनी मला हिंदी चित्रपटांमध्ये जास्त पाहिले नाही पण मी साऊथ चित्रपटांमध्ये खूप काम केले आहे. लोक मला म्हणत होते कि लग्नानंतर माझे करियर संपेल. तेव्हा मी कोणावर लक्ष दिले नाही आणि मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले.

अभिनयाशिवाय जेनेलियाने चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. याशिवाय तिचा आगामी मिस्टर मम्मी चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. ज्यामध्ये ती रितेशसोबत दिसणार आहे. तर रितेश देशमुखबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर त्याच्या करियरला चांगलीच गती मिळाली. त्याने हाऊसफुल, मालामल वीकली आणि बागी ३ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment