फोर मोर शॉट्स फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा सेलिब्रिटींची कमी नाही ज्यांनी गुपचूप लग्न केले आणि नंतर अचानक फोटोज शेयर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अशामधून आता फोर मोर शॉट्स फेम अभिनेती मानवी गागरूने देखील चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अभिनेत्रीने सीक्रेट इंगेजमेंटनंतर आता गुपचूप लग्न उरकले आहे. टीव्ही, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलेली अभिनेत्री मानवी गागरू विवाह बंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो तिने स्वतः सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.
फोटोमध्ये न्यू वेड कपल अतिशय सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या चमकदार साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. मानवी गागरूने आपल्या लग्नातील काही निवडक फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचा पती कुमार वरुणसोबत पोज देताना दिसत आहे. लाल रंगाच्या डिझायनर साडीमध्ये अभिनेत्री मानवी खूपच सुंदर दिसत आहे. तर लग्नामध्ये तिने नो मेकअप लुकच पसंद केला. भांगेत सिंदूर, गळ्यामध्ये हार, हातामध्ये मेहेंदी आणि बांगड्या घातलेली मानवी नववधूच्या वेशात सुंदर दिसत होती.
तर तिचा पती कुमार वरुणने व्हाईट कलरची शेरवानी घातली होती. दोघांनी आपले लग्न रजिस्टर देखील केले आहे आणि त्याचबरोबर दोघे खूपच खुश देखील पाहायला मिळत आहेत. दोघांनी आपले लग्न खूपच सिक्रेट घेतले होते. ज्याची कोणाला भनक देखील लागली नाही.
कुटुंबातील जवळचे लोकांशिवाय इंडस्ट्रीमधील कोणाला देखील मानवीने लग्नाचे आमंत्रण दिले नव्हते. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि मानवीने कुमार वरुणसोबत एंगेजमेंट केली आहे. आता सोशल मिडियावर लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांसोबत सेलिब्रिटी देखील तिला शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanvi Gagroo (@maanvigagroo)

Leave a Comment