पती आणि पत्नीचे नाते सात जन्माचे मानले जाते. तथापि आजच्या मॉडर्न काळामध्ये हे नाते एक जन्म टिकले तरी खूप आहे. कोणत्याही हॅप्पी मॅरिड लाईफसाठी विश्वास आणि निष्ठा खूप आवश्यक आहे. पण अनेकवेळा काही खास कारणामुळे पार्टनर धोका देण्यास भाग पडतो. त्याचे लग्नानंतर देखील एखाद्यासोबत अफेयर चालू राहते. अफेयर पती आणि पत्नी दोघांचेहि असू शकते. आजच्या या आर्टिकलमध्ये आपण पत्नी अफेयर का करते यावर चर्चा करणार आहोत.
पहिल्या प्रेमाची आठवण :- लग्नाच्या अगोदर मुलींचे बॉयफ्रेंड असणे सामान्य बाब आहे. समस्या तर तेव्हाच येते जेव्हा लग्न झाल्यानंतर देखील ते त्यांना विसरू शकत नाहीत. जर ते आपल्या लग्नाने खुश नसतील तर बॉयफ्रेंडची आठवण देखील अधिक येऊ लागते. नंतर भावनांच्या भरामध्ये तिचे अफेयर सुरु होते.
घरगुती हिंसा :- जर लग्नानंतर पती महिलेसोबत मारहाण करत असेल, तिचा आदर करत नसेल तर पत्नीसाठी घर आणि लग्न नरक बनून जाते. याशिवाय त्या आपल्यासाठी नवीन जोडीदाराचा शोध सुरु करतात. त्यांना दुसरे पुरुष आपल्या पतीपेक्षा चांगले वाटू लागतात.
बदला :- काही महिला फक्त पतीचा बदल घेण्याच्या इच्छेमध्येच दुसऱ्यासोबत अफेयर सुरु करतात. जर पतीचे दुसऱ्या ठिकाणी अफेयर सुरु असेल तर पत्नी देखील त्याला धडा शिकवण्यासाठी हेच काम करते. याशिवाय पती जर थोड्या थोड्या कारणामुळे शंका घेत असेल आणि कोणत्याही कारणावरून त्रास देत असेल तर पत्नीमध्ये बदल्याची भावना तिच्यामध्ये जागृत होते.
जबरदस्ती विवाह :- अनेकवेळा मुलीचे लग्न करण्याची इच्छा नसेल तरीही आईवडीलांच्या दबावामुळे त्या लग्न करतात. अशाप्रकारच्या लग्नामध्ये महिला जास्त खुश राहत नाहीत. यामुळे लग्नानंतर पती पसंत नसल्यास त्यांना अफेयर करण्याची इच्छा जागृत होते.
रोमांसमध्ये कमी :- लग्नाच्या काही वर्षानंतर पतीचा रोमांस आणि इंटरेस्ट कमी होऊ लागतो. अशामध्ये आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पत्नी नाईलाजाने दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते. अनेक वेळा पती शारीरिक रूपाने इतका मजबूत नसतो कि महिलेला चरम सुखाची प्राप्ती करून देऊ शकेल. यामुळे देखील महिला बाहेर अफेयर सुरु करतात.
काही नवीन करण्याची इच्छा :- अनेक वेळा महिला आपल्या मॅरिड लाईफला बोर होतात. त्यांच्या मनामध्ये नवीन प्रयोग करण्याची इच्छा जागृत होते. त्या लग्न तोडण्याचा विचार करत नाही पण वन टाइम फनच्या चक्करमध्ये त्या अफेयर करू लागतात.
इमोशनल सपोर्ट न मिळणे :- जेव्हा कधी एखादी महिला दुखामध्ये असते तेव्हा पत्नीला पतीकडून इमोशनल सपोर्ट हवा असतो. जर पती आपल्या पत्नीला सपोर्ट देत नसेल आणि एखादा दुसरा पुरुष भावनात्मक आधार देत असेल तर पत्नीचे मन विचलित होण्यास वेळ लागत नाही.
भांडण तंटे :- जर पती पत्नीदरम्यान सतत भांडण तंटे होत असतील तर हा एक असा पॉइंट असतो जेव्हा पत्नी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ लागते.