सलमान खानपासून अमिताभ बच्चन पर्यंत, आपले खरे नाव लपवून ‘या’ कलाकारांनी मिळवली अमाप प्रसिद्धी…

By Viraltm Team

Published on:

व्यक्तीचे नावच त्याची मोठी ओळख असते आणि ते आपल्या नावानेच जगभरामध्ये ओळखले जातात. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी कलाकारांना खूपच संघर्ष करावा लागतो. कधी कलाकार आपली खरी ओळख लपवून ठेवतात. यादरम्यान आम्ही तुम्हाला अशा काही बॉलीवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे खरे नाव काही वेगळेच आहे. पण ते आपल्या नकली नावानेच बॉलीवूडमध्ये ओळखले जातात.

अमिताभ बच्चन: या लिस्टमध्ये सर्वात पहिले नाव बॉलीवूड इंडस्ट्रीमधील शहंशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अमिताभ बच्चनचे येते. अमिताभ बच्चनचे खरे नाव इंकलाब श्रीवास्तव आहे. पण फिल्मी जगतामध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलून अमिताभ बच्चन ठेवले आणि याच नावाने नंतर ते जगभरामध्ये ओळखले गेले.

अजय देवगन: प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अजय देवगणचे खरे नाव विशाल वीरू आहे. तो प्रसिद्ध अॅक्शन कोरिओग्राफर वीरू देवगणचा मुलगा आहे पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्याने आपले नाव बदलून अजय ठेवले आणि त्याचे बहुतेच चित्रपटांमध्ये नाव अजयच ठेवले गेले.

गोविंदा: प्रत्येक चित्रपटामध्ये उत्तम कॉमेडीचा तडका लावणारा वर्सेटाइल अभिनेता गोविंदाचे नाव कोण नाही ओळखत. गोविंदाचे खरे नाव गोविंद अरुण आहुजा आहे. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला गोविंदा नावानेच ओळखले जाते. असे खूपच कमी लोक असतील ज्यांना गोविंदाचे खरे नाव माहिती आहे.

जॉन अब्राहम: बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणारा अभिनेता जॉन अब्राहमचे खरे नाव फरहान अब्राहम होते. तथापि त्याने फिल्मी जगतामध्ये येण्यापूर्वी आपले नाव बदलून जॉन अब्राहम असे ठेवले.

हृतिक रोशन: हृतिक रोशन प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता राकेश रोशन यांचा मुलगा आहे. पिता-पुत्र दोघांनी मिळून चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हृतिक रोशनचे खरे नाव रितिक नागरथ आहे.

मिथुन चक्रवर्ती: या लिस्टमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तीचे देखील नाव सामील आहे. मिथुन चक्रवर्तीचे खरे नाव गोरांग चक्रवर्ती होते पण त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर आपले नाव बदलून मिथुन चक्रवर्ती ठेवले.

सैफ अली खान: बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचे नाव साजिद अली खान आहे. नवाब घराण्यातील साजिद अली खान सैफ अली खान या नावाने जगभर प्रसिद्ध आहे.

सनी देओल: हिंदी चित्रपटामधील दिग्गज अभिनेता धर्मेंद्रचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देवल आहे. पण त्याला जगभरामध्ये सनी देओल नावाने ओळखले जाते. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देवल आहे.

सलमान खान: बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दबंग स्टार सलमान खानची एक वेगळी स्टाईल आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील खूपच मोठी आहे. पण सलमान खानचे खरे नाव अब्दुल रशीद खान आहे. पण फिल्मी जगतामध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्याने आपले नाव बदलून सलमान खान केले.

Leave a Comment