बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री नेहमी खळबळजनक बातम्यांनी भरलेली असते. आज प्रत्येकजण हा सोशल मिडियावर अॅक्टिव असतो. आपले मत व्यक्त करण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडिया सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग बनला आहे. सोशल मिडियावर सामान्य माणसापासून ते सेलेब्रिटीपर्यंत सर्वजण अॅक्टिव असतात.
अनेक बॉलीवूड स्टारदेखील आपल्या आयुष्यासंबंधी खुलासे या सोशल मिडियावर करत असतात. तर याच्या उलट काही स्टार्स असे देखील आहेत जे यापासून नेहमी दूर राहतात. आता नुकतेच अभिनेत्री फातिमा सना शेखचे नाव देखील यामध्ये सामील झाले आहे. दंगल गर्ल फातिमा सना शेखने नुकतेच सोशल मिडियावर काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्रीच्या अचानक घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे तिचे चाहते देखील हैराण आहेत. तिचे अनेक चाहते असे देखील आहेत जे तिच्या या निर्णयाला पाठींबा देत आहेत. कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्वातंत्र्य असणे हा अधिकार आहे. हा अधिकार आपल्या संविधान देखील देतो. अनेक चाहते फातिमा सना शेखच्या या निर्णयावर नाराज झाले आहेत. कारण त्यांना आता आपल्या आवडत्या स्टार बद्दल काहीच जाणून घेता येणार नाही. आज आपल्या या अभिनेत्रीच्या लाईफसंबंधी एक किस्सा जाणून घेणार आहोत.
जेव्हा अभिनेत्रीचे एका मुलासोबत भांडण झाले होते तेव्हा या दरम्यान अभिनेत्रीने त्याची चांगलीच धुलाई केली होती. फातिमा सना शेखने एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. यादरम्यान तिने एका किस्स्याबद्दल सांगताना म्हंटले कि, एकदा मी जिममधून बाहेर रस्त्यावरून चालले होते तेव्हा एक मुलगा मला एकटक पाहत होता.
तेव्हा मी त्याला विचारले कि काय बघतो आहेस, तेव्हा तो मला म्हणाला, कि मी बघणार माझी मर्जी. मी म्हणाले मार खायचा आहे का, तेव्हा तो म्हणाल मार, अभिनेत्रीने पुढे सांगितले कि आमच्या दोघांमध्ये खूप भांडण झाले आणि रागाच्या भरात मी त्याला थप्पड मारली.
फातिमाला देखील त्याने एक ठोसा मारला. फातिमा म्हणाली, मी थप्पड मारल्यानंतर त्याने मला एक ठोसा मारला आणि मी रस्त्यावर पडले. मी लगेच पप्पांना फोन केला आणि संपूर्ण घटनेविषयी सांगितले. पप्पा लगेच दोन तीन जणांना घेऊन माझ्याकडे आले.
पण तोपर्यंत तो मुलगा पळून गेला होता. फातिमा सना शेखने २०१६ मध्ये आमीर खानचा दंगल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. याआधी तिने बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. आपल्या मुलाखतीदरम्यान फातिमा सना शेखने का’स्टिं’ग का’उ’च बद्दल देखील सांगितले.
अभिनेत्री म्हणाली कि, मी देखील का’स्टिं’ग का’उ’चची शिकार झाली आहे. माझ्यासोबत अनेक वेळा असे झाले आहे, जेव्हा म्हंटले गेले कि तुला काम पाहिजे असेल तर से’क्स देखील करावा लागेल. अश्यामुळे अनेक प्रोजेक्ट माझ्या हातून गेले.
View this post on Instagram