बॉलीवूड आणि टीव्ही जगतामध्ये एकापेक्षा एक हँडसम अभिनेते आहेत पण आज आपण टीव्ही जगतातील अशा हँडसम अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो १२ वी फेल झाला होता म्हणून त्याची खूप टिंगल उडवली होती परंतु आज तो खूप मोठा स्टार आहे आणि त्याला बघायला देखील लोक खूप उत्सुक असतात.

आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो शोएब इब्राहिम आहे. जो टीव्ही जगतातील सर्वात हँडसम आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. आज आम्ही तुम्हाला याच्याबद्दलच सांगणार आहोत. शोएब इब्राहिमचा जन्म २० जून १९८७ रोजी भोपाळ मध्ये झाला होता.शोएब इब्राहिमने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिरीयलमध्ये काम केले आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि टीव्ही जगतातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री दीपिका कक्कडसोबत त्याने लग्न केले आहे. यांची जोडी टीव्ही जगतातील हिट जोडींपैकी एक आहे. एका बातमीनुसार शोएब इब्राहिम १२ वी मध्ये फेल झाला होता आणि यामुळे सर्वांनी त्याची खूप टिंगल उडवली होती.
आज त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे कि त्याला पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. आता तो टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. टीव्हीवरील सर्वात सुपरहिट ससुराल सिमर का या सिरीयलमध्ये त्याने काम केले आहे.