सिनेमा जगतामधून मोठी वाईट बातमी समोर आली आहे. लेखक आणि दिग्दर्शक फैसल सैफ यांचे निधन झाले आहे. दिग्दर्शक फैसल सैफचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले. माहितीनुसार गेल्या एका महिन्यापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.

फैसल सैफ यांच्या मृत्यूचे कारण त्यांचे अवयव निकामी झाल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. फैसल सैफ यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये अंतिम श्वास घेतला. त्यांचे भायखळा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

दिग्दर्शक फैसल सैफने साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील निर्माता बालू यांच्या महेंद्र सिनेमा स्कूलमधून सिनेजगतामध्ये पाउल ठेवले. त्यांनी अनेक अनेक कंपन्यांसाठी म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित करून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. फैसलने इंग्रजी आपला पहिला चित्रपट पिक मी बनवला होता. या चित्रपटामध्ये ब्रिटिश अभिनेत्री हेले क्लेघोर्नने मुख्य भूमिका केली होती.

हा चित्रपट वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्येही देखील गेला होता. जिथे अनेक समीक्षकांनी त्याची प्रशंसा केली. फैसल सैफने २००६ मध्ये ऋषिता भट्ट अभिनीत जिज्ञासा चित्रपट बनवला आणि या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.

हा चित्रपट त्यावेळचा सर्वात विवादस्पद आणि चर्चित चित्रपटांपैकी एक होता. याशिवाय फैसल सैफला पांच घंटे में पांच करोड़ या थ्रिलर चित्रपटासाठी आणि कविता भाभी या वेब सिरीजच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. त्यांनी २०१५ मध्ये फॉर अडल्ट ओनली नावाने एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये इंटरनेशनल अभिनेत्रीला ते कास्ट करू इच्छित होते. पण नंतर त्यांनी याला बंद क्र्नायची घोषणा करून सर्वांना हैराण केले होते.

सैफने २०१४ मध्ये टेलीकास्ट झालेल्या बिग बॉसच्या ८ व्या सीजनमध्ये एक कंटेस्टेंट म्हणून वाइल्ड कार्ड एंट्री घेणार होते. पण त्यांना हे सांगून नाकारले गेले होते कि जेव्हा रजनीकांतने त्यांना सर्वात मजबूत कंटेंडर म्हणून सिद्ध केले होते तर त्यांनी वाइल्ड कार्ड एंट्री का घ्यावी.