अमेरिकेमध्ये जॉर्ड फ्लॉयडच्या मृत्यूनंतर रंगभेदाचा मुद्दा चांगला उफाळला होता. प्रत्येक ठिकाणी काळ्या रंगाबद्दल चर्चा होत होती. प्रभाव हा झाला कि भारतामध्ये देखील यूनिलीवर कंपनीने आपल्या ब्यूटी क्रीम फेयर एंड लवलीचे नाव बदलले. जर इंडस्ट्रीमध्ये पाहायला गेले तर वेळोवेळी बॉलीवूडमध्ये देखील सावळ्या अभिनेत्री आल्या आणि त्यांच्या मेहनतीसमोर कोणीही त्यांच्या रंगावर लक्ष दिले नाही. आज आपण आशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
१. काजोल: ९० च्या दशकामधील ज्या चित्रपटांमध्ये काजोल एक अभिनेत्री म्हणून पाहायला मिळाली होती त्यामध्ये काजोल खूपच सावळी पाहायला मिळाली होती. भलेहि आज तिला पाहून कोणीही म्हणू शकणार नाही कि तिची मेहनत तिच्या रंगावर भारी पडली. बॉलीवूडमध्ये एका पेक्षा एक उत्कृष्ठ चित्रपट देऊन तिने स्वतःला सिद्ध केले.
२. शिल्पा शेट्टी: शिल्पा शेट्टीला फिटनेस फ्रिक म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. आज देखील तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. खूपच सुंदर असलेली हि अभिनेत्री आपली पूर्ण काळजी घेते. पण जेव्हा शिल्पाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तिचे रंगरूप खूप वेगळे होते. काळानुसार सर्व काही बदलले आणि शिल्पा देखील बदलली. पण दर्शकांनी तेव्हा देखील तितकेच प्रेम दिले आणि आज देखील तिला तितकेच पसंद केले जाते.
३. प्रियांका चोप्रा: मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी प्रियांका चोप्राने हे सिद्ध केले कि कर्तृत्वासमोर रंग महत्त्वाचा नसतो. तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकामागून एक अनेक चित्रपट केले. आज ती ज्या स्थानावर आहे यामुळे फक्त तिच्या कुटुंबालाच नाही तर पूर्ण भारताला तिच्यावर गर्व आहे.
४. दीपिका पादुकोण: करियरच्या सुरुवातीला दीपिका देखील सावळ्या रंगाची होती पण तिने आपल्या रंगाला कधीच आपल्या सफलतेच्या आडवे येऊ दिले नाही. आपल्या मेहनतीच्या बळावर ती खूप पुढे गेली. आज दीपिकाचे नाव बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. जिने अनेक दमदार भूमिका मोठ्या पडद्यावर साकारल्या.
५. बिपाशा बसु: बंगालची एक मुलगी जिने मोठ्या पडद्यावर येताच धुमाकूळ घातला होता. बिपाशा सावळ्या रंगाची होती आणि तिला लहानपणी आपल्या घरामध्ये आपल्या रंगाबद्दल अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. आपला हा किस्सा तिने स्वतः सांगितला होता. पण बॉलीवूडमध्ये तिने मोठी सफलता मिळवली. बिपाशा बसुला मोस्ट सेक्सी हीरोईन म्हणून ओळखले जाते.
बॉलीवूडच्या टॉप-५ सावळ्या अभिनेत्री, नंबर २ करते संपूर्ण जगावर राज…!
By Viraltm Team
Updated on: