बॉलीवूड इंडस्ट्री हादरली ! बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकाचे निधन, ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधून मोठी दुखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ आता या जगामध्ये राहिले नाहीत. ६२ व्या वर्षी त्यांचे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हि बातमी समोर येताच बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक फिल्मी कलाकार मेकरला श्रद्धांजलि देत आहेत.

ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांचे निधन झाले. इस्माइल यांना सुरुवातीपासूनच चित्रपटांची आवड होती. आपल्या करियरदरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना थोड़ी सी बेवफाई चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यांनी आहिस्ता आहिस्ता, अगर बुलंदी, सूर्या, गॉड एंड गन, पुलिस पब्लिक, निश्चय, दिल… आखिर दिल है, झूठा सच, लव ८६, जिद, थोड़ा तुम बदलो थोड़ा हम सारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांना खरी ओळख थोड़ी सी बेवफाई चित्रपटामधून मिळाली.

हा चित्रपट त्यांचा भाऊ मोइनुद्दीनने लिहिला होता. त्यांनी राजेश खन्ना पासून ते राजकुमार सारख्या मोठ्या कलाकारांसोबत चित्रपट बनवले आहेत. इस्माइल श्रॉफ इंजीनियर स्टूडेंट राहिले आहेत. त्यांनी तिरुचिरापल्ली येथून साउंड इंजिनिअरिंग केले होते. नंतर ते चित्रपटांमध्ये करियर करण्यासाठी मुंबईला आले. करियरच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

फिल्मी जगतामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ध्वनी अभियांत्रिकीचा कोर्स केला होता. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये आपले करियर बनवण्यासाठी मुंबईकडे प्रस्थान केले. इस्माइल श्रॉफने करियरची सुरुवात थोड़ी सी बेवफाई चित्रपटाद्वारे केली होती. यानंतर ते एकामागून एक चित्रपट बनवत गेले.

Leave a Comment