पहिल्या मा’सि’क पा’ळी’बद्दल अभिनेत्री दीपिका पादुकोणने केले पहिल्यांदाच मोठे वक्तव्य, म्हणाली; त्या क्षणी मी…

By Viraltm Team

Published on:

ओम शांती ओम चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोणत्याही ओळखीची गरज नाही. उत्कृष्ठ अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेमध्ये राहणारी अभिनेत्री दीपिकाने डिप्रेशन, नैराश्य यावर भाष्य केले आहे.

यादरम्यान तिने आता आपल्या पहिल्या मासिक पाळीबद्दल देखील मोठे भाष्य केले आहे. जागतिक मासिक पाळी आणि स्वच्छता दिनाचे औचित्य साधून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनने तिच्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव शेयर केला आहे.

सध्या सोशल मिडियावर दीपिका पदुकोनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पीरिअड स्टोरीवर आधारित शेयर करण्यात आला असून यामध्ये दीपिकाने आपल्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव सांगताना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

यादरम्यान दीपिका पुढे म्हणाली कि, माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीच्या आईने आम्हाला मासिक पाळीविषयी सांगितले होते. मी माझी मैत्रीण आणि तिची आई आम्ही तिघीजण एकत्र बसलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला पीरिअड्स म्हणजे काय हे सांगितले.

अगदी मासिक पाळी म्हणजे काय, त्यादरम्यान काय होते, शरीरामध्ये कोणते बदल होतात हे सर्वकाही सांगितले. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असे दीपिका म्हणाली. दीपिकाने सांगितलेल्या या अनुभवाचा व्हिडीओ टेक ब्रँड Nua चा खास व्हिडिओ आहे.

एका माहितीनुसार Nua चे संस्थापक आणि CEO रवी रामचंद्रन यांनी त्यांच्या निवेदनामधून आवाहन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे मुले आणि मुली यांच्यामधील पालकांशी संवाद वाढेल. ते पालकांसोबत अशा विषयावर बोलू शकत नाहीत. त्याच्या या आवाहनानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोनचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

Leave a Comment