बाळाला जन्म देणे आणि आई होणे दिसते तितके सोपे नाही. हा अनुभव जगातल्या कोणत्याही अनुभवापेक्षा मोठा आहे. पण एका स्त्रीला यासाठी खूपच वेदना सहन कराव्या लागतात. त्याचबरोबर बाळाच्या जन्मानंतर आईचा संघर्ष एवढ्यामध्येच थांबत नाही.
गर्भामध्ये होणारी बाळाची वाढ आणि प्रसूती नंतर येणारे पोटावरील व्रण म्हणजेच स्ट्रेच मार्क्स हे तसेच राहतात. योग्य व्यायाम आणि आहार घेऊन शरीर पुन्हा स्लिम करता येते पण हे व्रण लवकर जाता जात नाहीत आणि यानंतर सुरु होते हे व्रण लपवण्याची खटपट.
पोटावर असलेल्या या स्ट्रेच मार्क्सबाबत मॉडेल म्हणून ओळखली जाणारी दीपा भुल्लर खोसला सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. प्रसूतीनंतर शरीर कसे दिसते हे सांगणारा एक फोटो तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे.
ज्यामध्ये तिने आपल्या पोटावरील स्ट्रेच मार्क्स स्पष्टपणे दाखवले आहेत. असे करण्यापूर्वी तिच्या मनामध्ये झालेली घालमेल तिने आपल्या कॅप्शनमध्ये स्पष्टपणे सांगितली आहे. ती म्हणालीकि हि उत्सुकता आहे कि प्रसुतीच्या साडेतीन महिन्यानंतर माझे शरीर कसे दिसेल? तर हे बघा माझे शरीर असे दिसते.
गरोदरपणामध्ये शरीरावर ताबा कसा मिळवायचा असे विचारणाऱ्या सर्व मातांना मी सांगू इच्छिते कि बाळाला जन्म दिल्यानंतर आईच्या शरीरामध्ये खूप मोठे बदल होतात. पण त्वचेवरचे हे स्ट्रेच मार्क्स स्वीकारणे खूपच कठीण जाते.
खाण्यापिण्यावर लक्ष आणि व्यायाम करून शरीर स्लिम ठेवता येईल पण माझे पूर्ण शरीर अधिसारखे होणार नाही हे मला स्वीकारार्ह आहे. हे शरीर कधी एका जीवनाला आसरा देत होते. याच शरीरामध्ये आज माझ्या हातामध्ये असलेल्या बाळाला वाढवले आहे. मी हे स्ट्रेच मार्क्स अजून देखील स्वीकारले नसले तरी मी ते गर्वाने मिरवत आहे.