धूम ३ मध्ये आमिर खानची भूमिका करणारा मुलगा आठवतो का ? आता आठ वर्षानंतर दिसतो इतका हँडसम…

By Viraltm Team

Published on:

२०१३ मध्ये आलेल्या आमिर खान आणि कॅटरीना कैफचा धूम ३ चित्रपट २०१३ मध्ये सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला होता. चित्रपटामध्ये आमिर खानच्या बालपणाची भूमिका करणाऱ्या बालकलाकाराला खूपच पसंद केले गेले होते. हि भूमिका सिद्धार्थ निगमने केली होती. सिद्धार्थ निगम आता खूप मोठा झाला आहे. सिद्धार्थ निगम आता टीव्ही जगतामधील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे.

सिद्धार्थ निगम प्रयागराज उत्तरप्रदेश येथील राहणारा आहे. सिद्धार्थ इलाहाबाद उत्तर प्रदेश येथून मुंबईला आला होता, जिथे त्याने आपल्या करियरची सुरुवात एक जिमनास्ट म्हणून केली होती. त्याची राष्ट्रीय स्तरावर देखील निवड झाली होती तिथे त्याने गोल्ड मेडल आपल्या नावावर केले होते.

याशिवाय त्याने भारताचे विदेशामध्ये देखील प्रतिनिधित्व केले आहे. धूम ३ नंतर सिद्धार्थ निगम टीव्हीवरील महा कुंभ: एक रहस्य, एक कहानी मध्ये दिसला होता. या सिरीयलमध्ये त्याने छोट्या रुद्रची भूमिका केली होती. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

२१ वर्षानंतर सिद्धार्थ निगमने चंद्रवर्तिन अशोक सम्राट, चंद्र नंदिनी आणि अलादीन नाम तो सुना ही होगा मध्ये देखील काम केले. याशिवाय त्याने शिवाजी पेशवा बाजीरावमध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणाची भूमिका केली होती. अभिनेता असण्यासोबत सिद्धार्थ निगम एक चांगला डांसर देखील आहे. त्याने रियालिटी शो झलक दिखलाजाच्या ९ व्या सीजनमध्ये काम केले होते. याशिवाय तो अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसला आहे. सिद्धार्थ नुकतेच वल्लाह-वल्लाह गाण्यामध्ये देखील पाहायला मिळाला होता.

सिद्धार्थ निगम सोशल मिडियावर खूपच जास्त सक्रीय आहे. तो नेहमी आपले फोटोज सोशल मिडियावर शेयर करत असतो. टीव्ही आणि चित्रपटांशिवाय सिद्धार्थ निगम जाहिरातींमध्ये देखील काम करताना पाहायला मिळाला आहे. सिद्धार्थ निगमने आमिर खानच्या बालपणाची भूमिका करण्याशिवाय मुन्ना मायकल चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या बालपणीची भूमिकाही साकारली होती. याशिवाय वरून धवनच्या जुडवा २ चित्रपटामध्ये त्याने बालपणाची भूमिका केली होती.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment