साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राय लक्ष्मी नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेमध्ये असते. अभिनेत्री नेहमी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून आपले बोल्ड फोटो शेयर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या फिगरचे लाखो चाहते आहेत पण एकेकाळी ती महेंद्रसिंग धोनीसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेमध्ये आली होती.
हे प्रकरण त्यावेळी खूपच गाजले होते. पण विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनीने अभिनेत्रीला कधीच त्याची गर्लफ्रेंड म्हणून जाहीररित्या स्वीकारले नाही, पण राय लक्ष्मीने अनेकवेळा मुलाखतीदरम्यान तिच्या आणि महेंद्रसिंग धोनीच्या नात्याचा उल्लेख केला आहे.
लग्नाच्या अगोदर महेंद्रसिंग धोनीचे नाव राय लक्ष्मी या अभिनेत्रीसोबत देखील जोडले गेले होते. २००८-२००९ मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि राय लक्ष्मी यांच्या रिलेशनच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. अनेकवेळा दोघे एकत्र देखील पाहायला मिळाले होते.
२०१४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीसोबतच्या ब्रेकअपबद्दल देखील सांगितले होते. ती म्हणाली होती कि मला आता या गोष्टीवर विश्वास बसू लागला आहे कि धोनी माझ्या आयुष्यामध्ये एक काळा डाग असल्यासारखे आहे जो अनेक वर्षांनंतर देखील जात नाही.
अभिनेत्री पुढे म्हणाली होती कि धोनीनंतर मी कधीच कोणासाठी रोमँटिक भावना मनामध्ये आणू शकली नाही. माजी क्रिकेटपटू श्रीशांतसोबत देखील अभिनेत्री राय लक्ष्मीचे नाव जोडले गेले होते. पण त्याबद्दल कोणतीहि अधिकृत माहिती समोर आली नाही. श्रीसंतने देखील या रिलेशनबद्दल कोणतेही वक्त्यव्य केले नाही.
View this post on Instagram
श्रीसंतने फक्त एकदा राय लक्ष्मीला सेटवर भेटल्याचे कबूल केले होते. अभिनेत्री पुढे म्हणाली कि ब्रेकअप खूपच सौहार्दपूर्ण होते. आम्हाला आजदेखील एकमेकांबद्दल खूप आदर आहे. अभिनेत्री स्वत:ला खूप लकी मानते कि तिच्या आयुष्यामध्ये महेंद्रसिंग धोनीसारखा व्यक्ती आला होता.