बॉलीवूड इंडस्ट्रीचा दबंग स्टार म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार सलमान खानची एक झलक मिळवण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. सुपरस्टार सलमान खान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील असा अभिनेता आहे जो त्याच्या स्टेटससाठी ओळखला जातो. जिथे तो अनेकवेळा लोकांच्या मदतीसाठी समोर आलेला पाहायला मिळतो तर कधी लोक त्याच्या रोषाला बळी पडलेले देखील पाहायला मिळतात.
असे अनेक प्रसंग आले जेव्हा सलमान खानचा राग लोकांना पाहायला मिळाला, पण एक असा क्षण देखील आला आहे जेव्हा सलमान खानला एका मुलीने जोरदार थप्पड मारली होती आणि हे प्रकरण त्यावेळी खूपच चर्चेमध्ये आले होते. सलमान खान नेहमीच चर्चेमध्ये राहतो. कधी तो वादामुळे तर कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तो चर्चेचा विषय बनतो. याशिवाय सलमान खान मोठ्या मोठ्या पार्ट्यांसाठी देखील ओळखला जातो.
अशाचप्रकारे २००९ मध्ये त्याने दिल्लीमध्ये एक ग्रँड पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार सामील झाले होते. माहितीनुसार सलमान खानने हि पार्टी दिल्लीच्या ५ स्टार हॉटेलमध्ये आयोजित केली होती ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन, शिबानी कश्यप, सोहेल खान आणि विजेंद्र सिंह सारखे सेलेब्स देखील सामील झाले होते.
असे म्हंटले जाते कि या पार्टीमध्ये दिल्लीमधील एका बिल्डरची मुलगी देखील सामील झाली होती. असे म्हंटले जते कि या मुलीने पार्टीमध्ये घुसताच सलमान खानला जोरदार थप्पड मारली होती. याशिवाय तिने सलमानचा लहान भाऊ सोहेल खान, अभिनेत्री सुष्मिता सहित अनेक बॉलीवूड सेलेब्सला शि व्या द्यायला सुरुवात केली होती. माहितीनुसार हि मुलगी त्यावेळी शुद्धीत नव्हती. असे म्हंटले जाते कि ती मुलगी न शेमध्ये एका मेल फ्रेंडसोबत गार्डला चकमा देत सलमान खानच्या पार्टीमध्ये घुसली होती.
सलमान खानने त्या मुलीला नम्रपणे पार्टीमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. पण मुलीने सलमान खानला थप्पड मारली. असे म्हंटले जाते कि यादरम्यान सलमान खानने खूप संतापला होता पण त्यावेळी त्याने सिक्योरिटी गार्ड्स द्वारे मुलीला बाहेर काढले. सलमान खानचे नाव यादरम्यान खूपच चर्चेमध्ये आले होते, तथापि लोकानी सलमानचे कौतक देखील केले होते.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच टायगर-३ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरीना कैफ देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. याशिवाय सलमान खानजवळ किसी का भाई किसी की जान चित्रपट देखील आहे ज्यामध्ये शहनाज गिल, पलक तिवारी सारखे कलाकार दिसणार आहेत. सध्या सलमान खान कलर्स टीव्हीवरील रियालिटी शो बिग बॉस १६ होस्ट करत आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.