‘जर माझी आई असती तर आज मी…’ दीपिकाने आपल्या प्रकृतीबद्दल केला मोठा खुलासा…

By Viraltm Team

Published on:

दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे खूपच चर्चेमध्ये असते. नुकतेच अस्वस्थ वाटू लागल्याने तिला रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागले होते. यानंतर प्रकृतीमध्ये सुधार झाल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. याआधी देखील चेन्नईमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान तिची प्रकृती बिघडली होती. हृदयाचे ठोके अचानक वाढल्याने तिला रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. ती ड्रिपेशनची देखील शिकार झाली होती. आता पुन्हा एकदा ती मेंटल हेल्थवर बोलताना दिसली.

दीपिका सध्या तमिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये आहे. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या ‘लिव्ह लव्ह लाफ’ या कार्यक्रमाचा विस्तार करत आहे. दीपिकाने स्वतः डिप्रेशनचा सामना केला असल्यामुळे ती वेळोवेळी लोकांना मानसिक रूपाने मजबूत राहण्यासाठी जागरूक करत असते. यासाठी तिने स्वतःचे मेंटल हेल्थ फाउंडेशन तयार केले.

दीपिकाने एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आपल्या मानसिक आरोग्याविषयी तिने या परिस्थितीत एक केयरगिवर किती महत्वाचा आहे हे सांगितले. तिच्या आयुष्यामध्ये याची भूमिका तिच्या आईने केली आहे. दीपिकाने म्हंटले कि जर तिच्या आईने तिच्या मानसिक आजाराशी संबंधित लक्षणे ओळखली नसती, तर यावेळी तिची स्थिती काय झाली असती याची कल्पना देखील करवत नाही.

यावेळी जेव्हा दीपिकाला मेंटल हेल्थ बद्दल कुटुंबाच्या भुमिकेबद्दल विचारले गेले तेव्हा तिने म्हंटले कि हे खूपच जरुरीचे आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील देखभाल करणाऱ्यांची भूमिका खूपच महत्वपूर्ण राहिली आहे. यामुळे माझी आई इथे आहे. यामुळे माझी बहिण अनेक वर्षांपासून या मोहिमेचा भाग आहे.

दीपिका पुढे म्हणाली कि जेव्हा मी देखभाल करणाऱ्यांची स्टोरी सांगते तेव्हा मला माहित असते कि देखभाल करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य तितकेच महत्वपूर्ण आहे, जितके आजारी व्यक्तीचे मानसिक आरोग्य असते. माझ्या प्रकरणामध्ये माझी आई आणि देखभाल करणाऱ्या लोकांनी माझ्या लक्षणांची ओळख केली नसती आणि डॉक्टरनी मला घेऊन जाण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सक्रियता दाखवली नसती तर आज माझी हालत कशी असती हे मला माहित नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Business of Fashion (@bof)

Leave a Comment