रणवीर सिंहसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका पदुकोणला ‘या’ पुरुषाने बोलावून घेतले होते, म्हणाला होता; बुरखा घालून सर्वांपासून लपून…

By Viraltm Team

Published on:

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. दोघे कधी कधी एकमेकांसाठी आपले प्रेम व्यक्त करण्यास जरादेखील मागेपुढे पाहत नाहीत. या कपलने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये एक ड्रीम डेस्टिनेशन वेडिंग केले होते. रणवीर आणि दीपिकाने आपल्या-आपल्या सोशल मिडिया हँडलवरून लग्नाचे सुंदर फोटो शेयर केले होते.

त्यांनी आपल्या या खास दिवशी मशहूर डिजाइनर सब्यसाचीचे कपडे घातले होते. अभिनेत्रीच्या लेहेंग्याची किंमत ८.९५ लाख रुपये होती. दीपिकाच्या लग्नाचे दागिने १ करोड रुपयांचे होते. फक्त दीपिकाच्या मंगळसुत्राची किंमत २० लाख रुपये आहे.

दीपवीरचे कस्टम मेड वेडिंग आउटफिट सब्यसाची मुखर्जीच्या द इंडिया रिवाइवल प्रोजेक्टचा एक भाग होते. भलेहि दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाच्या अनाउंसमेंटसोबत चाहत्यांना हैराण केले पण दोघेही अनेक महिने आपल्या सीक्रेट वेडिंगची तयारी करत होते. इतकेच नाही तर डिजाइनर सब्यसाची मुखर्जीने दीपिका पादुकोणला तिच्या लग्नाच्या अगोदरच आउटफिटच्या ट्रायलसाठी बोलावले होते. त्यावेळी दीपिकाला त्यांनी बुरखा घालून बोलावले होते.

एका मुलाखतीदरम्यान सब्यसाची म्हणाले कि दीपिकाने जेव्हा मला लग्नाबद्दल सांगितले तेव्हा माझ्या मनामध्ये पहिली गोष्ट आली ती ओह माय गॉड कारण याआधी अनुष्काने लग्न केले होते. इंडियामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या फिल्म स्टारच्या लग्नावर काम करत असता तेव्हा खूप टेंशन असेत कि हे सीक्रेट बाहेर तर निघणार नाही. मला वाटले कि अनुष्काच्या लग्नाच्या वेळी आमच्याजवळ एक महिना होता पण दीपिकाने ६ महिने दिले होते.

डिजाइनर सब्यसाचीने सांगितले कि दीपिकाला बुरखा घालण्यासाठी का सांगितले. त्यांनी म्हंटले कि माझ्या मुंबईमधील स्टोरमधील काही लोकांना हे माहिती होते. कारण दीपिका अनेकवेळेला गुपचूप माप देण्यासाठी येत असे. मला या गोष्टीची भीती होती कि हि गोष्ट लिक तर होणार नाही ना. यामुळे दीपिकाला मी सांगत होतो कि तू बुरखा घालून ये. पण दीपिका म्हणाली कि जर मी बुरखा घालून आले तर मला स्पॉट केले जाईल. डिजाइनर पुढे म्हणाला कि माझ्या फॅक्टरीतमध्ये १ हजार ८०० लोक काम करतात. बहुतेक लोकांना वाटत होते कि नाओमी कॅम्पबेलचे लग्न एका इंडियन प्रिंसशी होत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment