दुसऱ्याच्या बायकोला स्वतःची बायको मानत होता ‘हा’ अभिनेता, अभिनेत्यालाच घरातून काढले होते बाहेर…

By Viraltm Team

Published on:

दीपक तिजोरी बॉलीवूडमधील एक प्रसिध्द चेहरा आहे, पण ज्या सक्सेसच्या शोधामध्ये तो अभिनयाचे स्वप्न घेऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला होता ते कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आज २८ ऑगस्ट रोजी दीपक तिजोरी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आज आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

दीपकने बॉलीवूडमध्ये जवळ जवळ ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले, पण हिरो बनायचे त्याचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. नेहमी सपोर्टिंग रोलमध्ये दिसणाऱ्या दीपकने ९०च्या दशकामध्ये चांगले नाव कमवले होते. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्याला मिळाली नाही.

सध्या दीपक तिजोरी अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो दिग्दर्शक म्हणून देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. दीपक आणि आमिर खान अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते, दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. एका जुन्या मुलाखतीमध्ये दीपकने खुलासा केला होता कि आमिरने त्याला जो जीता वही सिकंदर आणि गुलाम सारखे चित्रपट मिळवून देण्यासाठी खूप मदत केली होती. इतकेच नाही तर आमिरने कधीच फुशारकी मारली नाकी कि त्याच्यामुळे दीपकला हे चित्रपट मिळाले. दीपकने आशिकी, खिलाड़ी, कभी हां कभी ना सारख्या इतर अनेक चित्रपटांमध्ये काम करून नाव आणि पैसा कमवला.

दीपकने दिल, दिल है कि मानता नहीं आणि अफसाना प्यार का सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. दीपक मुख्य अभिनेता म्हणून पहला नशा चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये पूजा भट्ट मुख्य भूमिकेमध्ये होती. दीपक-आमिर एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतात. आमिर त्याचा सिनियर होता.

शिक्षणानंतर अभिनयामध्ये रुची ठेवणाऱ्या दीपकने एक थिएटर ग्रुप ज्वाइन केला ज्यामध्ये आमिर खान, आशुतोष गोवारिकर, परेश रावल आणि विपुल दोशी देखील होते. यादरम्यान अभिनयामध्ये मित्रांनी केलेल्या कौतुकामुळे दीपक या करियरमध्ये खूपच गंभीर झाला. दीपकने सांगितले कि त्याने अभिनयाचा निर्णय तर घेतला पण त्याला काम मिळत नव्हते. त्याने ३ वर्षे मेकर्सच्या ऑफिसच्या फेऱ्या मारल्या, पण काहीच फायदा झाला नाही. या दरम्यान त्याने सिने ब्लिट्ज फिल्म पत्रिकामध्ये एक कार्यकारी म्हणून आणि नंतर मुंबईच्या सी रॉक हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम केले.

१९८८ मध्ये दीपकला तेरा नाम मेरा नाम चित्रपटामधून पहिली संधी मिळाली. चित्रपटानंतर त्याने टीव्हीवर देखील काम केले, पण काही खास करू शकला नाही. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि २०१७ मध्ये दीपकची पत्नी शिवानी तोमरने त्याला त्याच्या घरामधून बाहेर काढले होते. शिवानी नुसार दीपकचे इतर महिलांसोबत अफेयर होते. तथापि दीपक तिजोरी आपल्या पत्नीविरुद्ध कारवाई करण्यासाठी काउंसलरकडे गेला तेव्हा त्याला माहित झाले कि शिवानीने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट न देताच दीपकसोबत लग्न केले होते आणि शिवानी त्याची कायदेशीर पत्नी नव्हती.

Leave a Comment