मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का ! प्रसिद्ध कॉमेडीय काळाच्या पडद्याआड, ४२ दिवसांची मृत्यूची झुंज अपयशी…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव आता आपल्यामध्ये नाहीत. राजू श्रीवास्तवचे बुधवारी निधन झाले आहे. ते १० ऑगस्ट रोजी कार्डियक अरेस्टमुळे एम्समध्ये भरती झाले होते. राजू श्रीवास्तव ५८ वर्षाचे होते. त्यांना त्यावेळी कार्डियक अरेस्ट आला होता जेव्हा ते दिल्लीच्या एका जिममध्ये एक्सरसाइज करत होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांच्यासह सर्व बडे नेते आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

राजू श्रीवास्तवचा जन्म उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये २५ डिसेंबर १९६३ रोजी झाला होता. लहानपणी त्यांचे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. राजूला लहानपणापासूनची मिमिक्री आणि कॉमेडी करण्याची खूप आवड होती.

राजूला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कॉमेडी शो मधून ओळख मिळाली होती. या सक्सेसनंतर राजू श्रीवास्तवने कधीच मागे वळून पाहिले नाही. राजू श्रीवास्तवने १९९३ मध्ये शिखा श्रीवास्तवसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.

राजू श्रीवास्तवने राजकारणामध्ये देखील आपले नशीब आजमावले. त्यांना २०१४ मध्ये कानपुरमधून सपा करून लोकसभेसाठी तिकीट मिळाले होते. पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. यानंतर ते निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये सामील झाले.

पीएम मोदींनी त्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये नामांकित केले होते. यानंतर त्यांनी स्वच्छतेबाबत विविध शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्येही सहभाग घेतला राजू श्रीवास्तव यांना २०१९ मध्ये यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष बनवण्यात आले.

Leave a Comment