धक्कादायक ! ‘या’ प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्याला हृदयविकाराचा झ’ट’का, हॉस्पिटलमध्ये दाखल…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदचे अध्यक्ष राजू श्रीवास्तवची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार वर्कआउट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो ट्रेडमिलवरून कोसळला. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे. तथापि आता त्याच्या तब्येतीमध्ये सुधार होत आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता पण आता त्याची प्रकृती चांगली आहे. लवकरच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. पुढचे ४८ तास त्याला निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीनंतर चाहते खूपच चिंतेमध्ये आहेत. सर्व लोक सोशल मिडियावर पोस्ट करून आपल्या आवडीच्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. प्रसिद्ध कॉमेडियन असण्यासोबतच तो उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्षही आहेत.

राजू श्रीवास्तवने भारतासोबत विदेशामध्ये देखील अनेक स्टेज शोमध्ये आपल्या कॉमेडीचा जलवा दाखवला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने आपल्या कॉमेडीच्या ऑडियो कॅसेट आणि व्हिडीओ सीडीज लॉन्च केल्या होत्या. कॉमेडीचे करियर सुरु होण्यापूर्वी अमिताभ बच्चनचा डुप्लीकेट म्हणून तो ओळखला जात होता.

त्याने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये छोटे छोटे रोल करून आपल्या करियरची सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शंसच्या मैंने प्यार किया, बाजीगर आणि बॉम्बे टू गोवा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत.

टीव्ही वरील टॅलेंट शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजसोबत राजू श्रीवास्तवने स्टँड-अप कॉमेडीमध्ये एंट्री केली आणि या शोमध्ये त्याने रनर-अपचा किताब जिंकला होता. त्याला कॉमेडी चा बादशाह म्हणून देखील ओळखले जाते. बिग बॉस, नच बलिए सारख्या अनेक रियालिटी शोमध्ये या प्रसिद्ध कॉमेडियनने आपले नशीब आजमावले आहे. लोकप्रिय क्रिकेटर हरभजन सिंह आणि शोएब अख्तरसोबत राजू श्रीवास्तवने एक कॉमेडी शो देखील जज केला आहे.

Leave a Comment