सिनेसृष्टी पुन्हा हादरली ! राजू श्रीवास्तवनंतर आता ‘या’ दिग्गज कॉमेडियनचे निधन, सुनील पालने इमोशनल पोस्ट शेयर करून दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुखद बातमी समोर आली आहे. दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या निधनानंतर आता आणखी एका कॉमेडियनने या जगाचा निरोप घेतला आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनमधील कंटेस्टेंट पराग कंसाराचे निधन झाले आहे. पराग कंसाराचा मित्र आणि पसिद्ध कॉमेडियन सुनील पालने एक व्हिडीओ शेयर करून त्याच्या निधनाची बातमी दिली आहे.

ज्या दर्शकांनी पराग कंसाराला कॉमेडी करताना पाहिले, ते सर्व त्याच्या निधनामुळे खूपच दुखी आहेत. सुनील पालचा तो चांगला मित्र होता. सुनील पालने इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेयर करून त्याच्या निधनाची माहिती दिली आहे. पोस्ट शेयर करत त्याने लिहिले आहे कि, कॉमेडीच्या जगतामधून आणखी एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे, पराग कंसाराजी, आमचे लाफ्टर चॅलेंज पार्टनर आता या जगामध्ये नाहीत.

तो पुढे म्हणतो कि ते प्रत्येक गोष्टीवर उलटा विचार करून आम्हाला हसवत होते. पराग भैया आता या जगामध्ये नाहीत. कॉमेडीच्या जगताला कोणाची तरी नजर लागली आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी राजू भाईला गमवले होते. आम्ही एकामागून एक कॉमेडियन गमवत आहोत. सुनील पालने या व्हिडीओमध्ये दिपेश भानची देखील आठवण काढली, ज्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.

पराग बऱ्याच काळापासून टीव्ही आणि कॉमेडीपासून दूर होते. ते गुजरातच्या वडोदराचे राहणारे होते. पराग टीव्हीवरील सुपरहिट कॉमेडी रियालिटी शो ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसला होता. हा शो भारतीय टीव्हीवरील पहिला असा शो होता, ज्याने स्टँडअप कॉमेडियन्सना एक मोठे व्यासपीठ दिले दिले होते. शोने नवीन कॉमेडियन्सला देखील आपली ओळख बनवण्यासाठी संधी दिली. या शोमधील परागला घराघरामध्ये ओळख मिळाली होती.

पराग कंसारा द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सिझनचा कंटेस्टेंट होता. तथापि तो विनर बनू शकला नाही, पण त्याची कॉमेडी दर्शकांना खूपच आवडली होती. तो गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कॉमेडी शोमध्ये दिसला नाही.

Leave a Comment