चेहऱ्यावर किंवा डोळ्याखाली काळे डाग किंवा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा चेहऱ्यावर सुरुकुत्या असतील आणि त्या घालवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर आठवड्यामधून फक्त दोनवेळा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या या सर्व समस्या मुळासकट नाहीश्या होतील. त्याशिवाय चेहऱ्यावर पिगमेंटेशन त्याला आपण वांग देखील म्हणतो तर ते वांग देखील काही दिवसांमध्ये निघून जातील.
हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर इतका जबरदस्त ग्लो येईल आणि चेहरा इतका गोरा दिसू लागेल कि तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणारच नाही. फक्त एकदा तरी तुम्ही हे लावून ट्राय अवश्य करून पहा. तुम्हाला याचा प्रभाव लगेच पाहायला मिळेल. सनटॅन, सनबर्न किंवा शरीरावर कोणताही डाग असेल तरीही तुम्ही या उपाय करू शकता. चेहऱ्यावर तर फक्त पाच मिनिटामध्ये ग्लो येईल. याआधी तुम्ही बरेच उपाय करून पाहिले असतील पण हा उपाय तुम्ही एकवेळा अवश्य करून पहा. विशेष म्हणजे हा अगदी सोपा आणि सरळ उपाय आहे.
यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू घ्यायच्या आहेत. जे आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असतात. पहिली गोष्ट हा उपाय करण्यासाठी लागते ते म्हणजे दही त्यानंतर कोरफड, अर्जुन साल, आणि मध. हे मिश्रण तयार करण्यासाठी दोन चमचे दही, कोरफडीचे जेल दोन चमचे, अर्जुन सालीची पूड दोन किंवा चमचे घेऊ शकता, दोन चमचे मध घ्या. या चारी घटकांचे चांगले मिश्रण करून घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे. पंधरा मिनिटे चेहऱ्यावर राहू दिल्या नंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला लगेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला पाहायला मिळेल. चेहऱ्यावरचे काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे लगेच कमी झालेले पाहायला मिळतील. हा उपाय दररोज केल्यास खूपच उत्तम राहील.
दररोज दहा दिवस हा उपाय केल्यास मुरुमाचे काळे डाग, खड्डे, पूर्णपणे नाहीसे झालेले पाहायला मिळतील. त्याचबरोबर चेहऱ्यावर एक जबरदस्त ग्लो आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. हा उपाय केल्यास ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची तुम्हाला गरज देखील भासणार नाही.
जर तुम्हाला हा उपाय दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यामधून दोन वेळा हा उपाय अवश्य करावा. चेहऱ्यावर सतत पिंपल्सचा त्रास असेल किंवा मुरुमाचे सतत फोड येत असतील तर तो त्रास देखील या उपायाने दूर होईल. चेहऱ्यावरील वांग किंवा शरीरावरील इतर ठिकाणी असलेल्या काळ्या डागावर देखील हा उपाय प्रभावी ठरतो.