बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार पाहायला मिळतात ज्यांनी एक काळ प्रचंड गाजवला आहे. पण काळानुसार ते फिल्म इंडस्ट्रीमधून हळू हळू बाहेर गेले. यामधील एक अभिनेता आहे ज्याचे नाव चंद्रचूड सिंह असे आहे. अभिनेता चंद्रचूड सिंहला बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक मानले जात होते.
जब प्यार किया तो डरना क्या, तेरे मेरे सपने, माचिस यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेता चंद्रचूड सिंहने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले यश मिळवले होते. पण त्याने केलेल्या एका हट्टामुळे त्याला आपल्या करियरवर पाणी सोडावे लागले.
एका मुलाखतीदरम्यान त्याने याविषयी बरेच काही सांगितले आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरुख खान अशा दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या जोश चित्रपटामध्ये चंद्रचूड सिंहने महत्वाची भूमिका साकारली होती. ज्यानंतर त्याने केलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले.
पण या चित्रपटानंतर तो फिल्म इंडस्ट्रीमधून हळू हळू बाहेर गेला. काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या आर्या वेबसिरीजमध्ये देखील पाहायला मिळाला होता. पण त्याच्या अभिनयाची जादू तितकी पाहायला मिळाली नाही.
यावर चंद्रचूड म्हणाला कि त्यावेळी मी फक्त चांगल्या भूमिका घेत होतो. मला फक्त चांगला रोल करायचा होता. यादरम्यान चांगल्या भूमीला आल्या देखील पण काहीतरी वेगळे करण्याच्या नादात मी अनेक चांगल्या भूमिका करण्यास नकार दिला. थोडक्यात सांगायचे तर मी स्वतःला चित्रपटांपासून दूर केले.
त्यानंतर २००० मध्ये माझा मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. यातून सावरायला मला १० वर्षे लोटली. या १० वर्षामध्ये खूप काही चढउतार आले ज्याचा परिणाम माझ्या करियरवर देखील झाला.
२०१२ मध्ये मी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले पण यावेळी मला जिल्हा गाझियाबाद सारख्या चित्रपटामध्ये काम करावे लागले. पण पूर्वीप्रमाणे माझा अभिनय लोकांना आवडला नाही. अभिनेता चंद्रचूड सिंहने त्याच्या करियरमध्ये दवी – दि डिग्निफाइड प्रिन्सेस, तेरे मेरे सपने, माचिस, क्या कहना, जोश आणि दागः द फायर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.