टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना गेल्या काही दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे खूप चर्चेमध्ये आली आहे. पण या प्रकरणानंतर आता चाहत पुन्हा एकदा उर्फी जावेदसोबत सोशल मिडियावर भिडली आहे. चाहत आणि उर्फीदरम्यान इंस्टाग्रामवर चांगलीच जुंपली आहे.
चाहत खन्नाने जिथे उर्फीवर काम करणे आणि सेमी न्यू ड स्पॉमर्टिंग सारख्या गोष्टी बोलल्या आहेत तर उर्फीने चाहतला तिच्या दोन अयशस्वी विवाहांवर निशाणा साधत कमेंट केली आहे. इतकेच नाही तर स्वतः उर्फीने चाहतचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेयर केले आहेत.
चाहत खन्नाने उर्फीला टारगेट करत आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे बिना तथ्य. फक्त पब्लीसिटी साठी एखाद्या वादामध्ये उडी घेणे म्हणजे स्वतःला मूर्ख बनवणे. बुद्धीहीन लोकांशी काय वाद घालायचा, हुशार असती तर काम केली असती नाहीतर शूट केली असती. सेमी न्यू ड स्पॉटिंग केले नसते. चला काही नाही तू तर आंटी, पत्नी आणि आई बनण्याच्या लायक तर नाही, दुसऱ्यांनाच आंटी बनून खुश हो. यासोबत चाहत खन्नाने हॅशटॅगही जावेद देखील लिहिले आहे. वास्तविक उर्फीने चाहतला आंटी म्हंटले होते.
तर यावर पलटवार करत उर्फीने चाहतच्या पोस्टवर आपली स्टोरी शेयर करत लिहिले आहे कि, जरा सेमी न्यू डवर लक्ष दे… यानंतर उर्फीने चाहतचे काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. उर्फी जावेदने आपल्या स्टोरीमध्ये आपले व्हिडीओ देखील शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे कि हि किती आंटीवाली गोष्ट आहे कि तू आई, पत्नी बनण्याच्या लायक नाही आहेस.
मला कोणाची पत्नीच बनायचे नाही. मला हि कॉन्सेप्ट करायचीच नाही कि एक स्त्री आई किंवा पत्नी नाही बनली तर ती अपूर्ण आहे. मी या कॉन्सेकप्टमध्ये विश्वास करत नाही. मी तर पूर्ण कम्पलीट फील करते आणि चाहत तू संग तू तर दोन दोन वेळा पत्नी बनली आहेस. तुला माहिती असायला हवे कि लग्नामध्ये काही राहिले नाही. तिला १९२० मध्ये एक साईड रोल करताना पाहिले होते. तर तू कामाबद्दल बोलूच नकोस.