बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलची जोडी सर्वात चर्चित जोडींपैकी एक आहे. नेहमी हे दोघे कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेमध्ये राहत असतात. विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ यांनी गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये लग्न केले होते.

लग्नानंतर हे दोघे आपल्या प्रोजेक्टमुळे खूपच व्यस्त झाले पण यादरम्यान कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलच्या आयुष्यामध्ये एका महिलेचे आगमन झाले. अशामध्ये सोशल मिडियापासून ते प्रत्येक ठिकाणी विक्की आणि कॅटरीनाचीच चर्चा होत आहे.

सोशलमिडियावर प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खानने एक फोटो शेयर केला ज्यामध्ये कॅटरीनाचा पती म्हणजेच अभिनेता विक्की कौशलसोबत ती पाहायला मिळत आहे. हा फोटो शेयर करताना फराह खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, सॉरी कॅटरीना कैफ विक्की कौशलला आता दुसरे कोणीतरी मिळाले आहे. या फोटोवर कॅटरीना कैफने देखील मजेदार रिअॅक्शन दिले.

तिने लिहिले कि तुला फुल परवानगी आहे फराह. विक्की कौशल सध्या क्रोएशियामध्ये आहे जिथे तो फराह खानसोबत आपल्या बंदिश बैंडिट्स चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये फराह खान एक कोरियोग्राफर म्हणून काम करत आहे.

यादरम्यान फराहने विक्कीसोबत एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पाहू शकता कि विक्की कौशलने व्हाइट शर्ट ब्लू पँट घातली आहे तर फराह खान ब्लॅक ऑउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. विक्की कौशल आणि कॅटरीनाने ९ डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानच्या सेन्स फोर्ट बरवाड़ामध्ये लग्न केले होते. दोघांनी लग्नाच्या अगोदर २ वर्षे एकमेकांना गुपचूप डेट केले होते. बॉलीवूडच्या या कपलच्या लग्नामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

कॅटरीनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सलमान खानसोबत टाईगर ३ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती मैरी क्रिसमस चित्रपटामध्ये विजय सेतुपती आणि जी ले जरा चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत काम करणार आहे.

विक्की कौशलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच गोविंदा नाम मेरा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर विक्की कौशल लुका छुपी २ चित्रपटामध्ये अभिनेत्री सारा आली खानसोबत काम करणार आहे.