अभिनेत्री आलियाने नुकतेच आपण आई होणार असल्याची आनंदची बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. यादरम्यान आता अभिनेत्री कॅटरिना कैफने देखील आनंदाची बातमी अपय चाहत्यांसोबत शेयर केली आहे. अभिनेत्रीने विक्की कौशलसोबत लग्न केले होते.
बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. चाहते देखील तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशामध्ये तिने आता आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कॅटरिनाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
अभिनेत्री कॅटरिनाचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाबद्दलची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केली आहे. चित्रपटाचे नाव फोन भूत असे आहे. कॅटरिनाने खास पोस्ट शेयर करून आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
कॅटरिनाचा हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पोस्ट शेयर करताना कॅटरिनाने लिहिले आहे कि, फोन भुताच्या जगात तुमचे स्वागत आहे. चित्रपटाचा टीजर आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. कॅटरिनाच्या चाहत्यांना आता तिला मोठ्या पडद्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
चित्रपटामध्ये कॅटरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. यादरम्यान कॅटरिनाचा नवीन सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
२२ सेकंदाच्या टीजरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावता येत नाही. पण कॅटरिनाच्या भूमिकेची झलक तिच्या चाहत्यांना नक्कीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता कॅटरिना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी भूत बनून येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.