‘बाथरूममध्ये उ घ डी च…’ जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेयर केले जान्हवीचे डार्क सिक्रेट…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी मिली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री तिच्या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये जान्हवीसोबत सनी कौशल आणि मनोज पाहवा देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

जान्हवी कपूरचा मिली चित्रपट हेलन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शो मध्ये देखील पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील बोनी कपूरदेखील होते. सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या शोचा एक प्रोमो देखील शेयर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे कि बोनी म्हणतात कि मी जेव्हा तिच्या खोलीमध्ये जातो तेव्हा तिचे सर्व कपडे विखुरलेले असतात. बाथरूममध्ये टूथपेस्ट उघडीच ठेवलेली असते. सुदैवाने ती फ्लश तर करते. बोनी कपूरचे हे म्हणणे ऐकल्यानंतर जान्हवी मोठ्याने पप्पा म्हणून ओरडते.

यादरम्यान शोमध्ये एकच हशा झालेला पहायला मिळतो. सोनी टीव्हीवर द कपिल शर्मा शो च्या गामी भागामध्ये या बाप-लेकीची जोडी धमाल करताना पाहायला मिळणार आहे. शोमध्ये कपिलचे ऑन-स्क्रीन कुटुंब दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला श्रद्धांजली देखील वाहताना दिसणार आहे. तर जान्हवी कपिलच्या कुटुंबासोबत तिच्या आईच्या हवा हवाई गाण्यावर डांस करताना दिसणार आहे.

जान्हवी कपूरचा मिली चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. विशेष बाब म्हणजे जान्हवी आणि तिचे वडील बोनी कपूर यांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. तिचे वडील बोनी कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे जान्हवीच्या या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment