या अभिनेत्रीने एका वॉचमनसोबत केला होता डेब्यू, चमकले नशीब, ३ वर्षांमध्ये दिले ३४ चित्रपट !

By Viraltm Team

Updated on:

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री किमी काटकरने १९८५ मध्ये फक्त २० व्या वर्षी पत्थर दिल चित्रपटामधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. तिने या चित्रपटामध्ये एक सपोर्टिंग रोल प्ले केला होता. पण त्याच वर्षी तिला एक असा चित्रपट मिळाला ज्याने बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घातला होता.

किमी काटकरने १९८५ मध्ये भारतामध्ये हिंदी भाषेमध्ये बनलेल्या अॅवडव्हेंचर ऑफ टार्झन चित्रपटमधून डेब्यू केला होता. हा चित्रपट दर्शकांना खूपच पसंत आला होता. चित्रपटामध्ये हेमंत बिरजे हिरो होते. या दोघांच्या जोडीला इतकी लोकप्रियता मिळाली कि दोघांचेही करियर चमकले. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि हेमंत बिरजे खऱ्या आयुष्यामध्ये दिग्दर्शकाच्या घरचे वॉचमन होते.
वॉचमन हाइट आणि मस्कुलर बॉडीमुळे डायरेक्टरने आपल्या वॉचमनलाच चित्रपटामध्ये कास्ट केले होते. चित्रपटाच्या डिमांडनुसार खूपच बोल्ड सीन होते ज्यामुळे जुम्मा म्हणजे किमीला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळाली आणि ती खूपच फेमस झाली.

या चित्रपटामध्ये दाखवले गेलेल्या इंटिमेट सीनमुळे हेमंत महिलांमध्ये देखील खूप लोकप्रिय झाले होते. चित्रपटामध्ये इतके जबरदस्त इंटिमेट सीन चित्रित करणारे पहिले बॉलीवूड अभिनेता होते. बिरजेतर नंतर फ्लॉप झाले पण किमी खूपच लोकप्रिय झाली. १९८६ मध्ये एक चित्रपट तिच्या हाती लागला १९८७ मध्ये पुढच्या तीन वर्षात म्हणजे १९८८-९० मध्ये ३४ चित्रपट प्रदर्शनासोबत प्रत्येक ठिकाणी किमी दिसू लागली होती.
१९९१ मध्ये तिचा हम हा संस्मरणीय चित्रपट आला होता ज्यामध्ये ती अमिताभ बच्चन सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिची दमदार भूमिका होती. चित्रपटामध्ये रजनीकांत आणि गोविंदा देखील होते. या वर्षामध्ये तिचे तीन चित्रपट आले आणि पुढच्या वर्षी आलेल्या ज़ुल्म की हुकूमत चित्रपटासोबत किमीने २७ व्या वर्षी इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला. तिने आपला मित्र आणि फोटो ग्राफर सोबत लग्न केले आणि ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाली.

Leave a Comment