शाहरुख खान, मुकेश अंबानी, सलमान खान सहित या कलाकारांच्या ड्राईव्हर आणि बॉडीगार्डला मिळतो इतका पगार !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवि सिंहला सर्वात जास्त वार्षिक २.५ करोड रुपये इतका पगार मिळतो. तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपल्या ड्राईव्हरला २.४ करोड रुपये इतका वार्षिक पगार देतात. शाहरुख आणि अंबानी शिवाय इतर अनेक बॉलीवूड कलाकार आहेत जे आपल्या ड्राईव्हर आणि बॉडीगार्डला करोडो रुपये पगार देतात. चला तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल.
सलमान खान: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बॉडीगार्डचे नाव शेरा आहे. सलमान खान आपला बॉडीगार्ड शेराला २ करोड रुपये वार्षिक पगार देतो. शेरा सलमान खानचा फक्त बॉडीगार्डच नाही तर एक चांगला मित्र देखील आहे. शेरा गेल्या वीस वर्षांपासून सलमान खानचे संरक्षण करत आहे.
आमिर ख़ान: बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफ़ेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर ख़ानच्या बॉडीगार्डचे नाव युवराज घोरपडे आहे. युवराज घोरपडेला आमिर ख़ान कडून वर्षाला २ करोड रुपये इतका पगार मिळतो. याशिवाय इतर अनेक सुविधा देखील त्याला मिळतात.
अमिताभ बच्चन: बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. जितेंद्र शिंदेला वर्षाला १.५ करोड रुपये इतका पगार मिळतो. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन यांचे संरक्षण करत आहे.
अक्षय कुमार: बॉलीवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक अक्षय कुमार आपला बॉडीगार्ड श्रेयसला वर्षाला १.२ करोड रुपये पगार देतो. यासोबत श्रेयसला इतर अनेक सुविधा देखील मिळतात. अक्षय कुमार श्रेयसला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतो.
दीपिका पादुकोण: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आपला बॉडीगार्ड जलालला वर्षाला जवळ जवळ ८० लाख रुपये पगार देते. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण आपला बॉडीगार्ड जलालला भाऊ मानते आणि त्याला रक्षाबंधनला नेहमी राखी बांधते.
सैफ आणि करीना: बॉलीवूड फिल्मी जगतामधील नवाब अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमुरची आया सावित्रीला महिन्याला १.५० लाख रुपये पगार मिळतो. ओव्हर टाईम केल्यानंतर तिला १.७५ लाख रुपये महिन्याला पगार दिला जातो.

Leave a Comment