जेव्हा लिव्ह-इनमध्ये राहू लागल्या होत्या या अभिनेत्री, कोणी केले लग्न तर कोणी बनल्या बिनलग्नाच्या आई…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक नाही अनेक लोकांना डेट केले आहे. यामधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या घटस्फोट किंवा ब्रेकअप नंतर पुन्हा प्रेमात पडल्या आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास जरादेखील संकोच केला नाही. या लिव्ह-इन रिलेशनशिपचा परिणाम असा झाली कि काही अभिनेत्रींनी तर आपल्या पार्टनरसोबत लग्न केले तर काही अभिनेत्री बिनलग्नाच्या आई झाल्या.

बॉलीवूड अभिनेत्री पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहसोबत दुसरे लग्न केले आहे. पूजा नवाबसोबत अनेक दिवस लिव्ह-इनमध्ये राहिली आणि त्यानंतर तिने सात फेरे घेऊन आपला संसार थाटला. पूजाने २००२ मध्ये सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते जो एक सर्जन होता पण दोघांच्या नात्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पूजाची आयुष्यामध्ये नवाब आला आणि दोघे प्रेमात पडले.

शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरचे सैफ अली खानवर प्रेम जडले. दोघांनी अने दिवस डेटिंग केल्यानंतर लिव्ह इनमध्ये देखील राहिले. यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. करीना सैफची दुसरी पत्नी बनली. तिच्या अगोदर सैफने अमृता सिंहसोबत लग्न केले होते पण दोघांचा घटस्फोट झाला.

साउथ अफ्रीकन मॉडल आणि अभिनेत्री गैब्रियाला बॉलीवुड अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेमात पडली. दोघे अनेक दिवस लिव्ह इनमध्ये राहिले. यादरम्यान गैब्रियाला प्रेग्नंट राहिली आणि ती एका मुलाची आई झाली. अर्जुन आणि गैब्रियालाने अजून देखील लग्न केलेले नाही आणि दोघे लिव्ह इनमध्ये राहत आपल्या मुलाचा सांभाळ करत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री कल्कि कोच्लिनचे पहिले लग्न अनुराग कश्यपसोबत झाले होते पण हे लग्न फार काळ टिकले नाही दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कल्कि कोच्लिन इजरायली पेंटर गाय हर्शबर्गच्या प्रेमात पडली आणि दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. यादरम्यान कल्की प्रेग्नंट राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव साफो आहे. कल्की अनिओ गायने अजून लग्न केलेले नाही.

कॅटरिना कैफ कधी काळी सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती पण यादरम्यान तिचे रणबीर कपूरवर प्रेम जडले. रणबीरसोबत प्रेम करणारी कॅटरिनाने सलमान खानसोबत ब्रेकअप केले. यानंतर रणबीरसोबत ती लिव्ह इनमध्ये राहू लागली होती तथापि जवळजवळ सहा वर्षानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

Leave a Comment