प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री दिल्लीजवळ गुरुग्राममध्ये निधन झाले आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी लिहिले आहे कि ४५ वर्षाच्या मैत्रीवर आज पूर्ण विराम लागला.

सतीशशिवाय आता आयुष्य पाहिल्यासारखे राहणार नाही. सतीश कौशिक कामासास्ठी तिथे आले होते यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. तत्काळ त्यांना गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पीटलमध्ये नेण्य्त आले, पण त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या दीनदयाल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम नंतर त्यांचे पार्थिव मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.

सतीश कौशिकने ६७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सतीश कौशिक आणि अनुपम खेर दोघे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या काळापासून एकत्र आहेत. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, ‘मला माहित आहे की मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे. पण हि गोष्ट मी माझ्या मित्रासाठी लिहीन याचा कधीच विचार केला नव्हता. ४५ वर्षाच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पाहिल्यासारखे राहणार नाही, ओम् शांति!’

१३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणाच्या महेंद्रगढ़मध्ये जन्मलेल्या सतीश कौशिकने दिल्लीच्या किरोड़ीमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या अभिनय करियरचे डेब्यू १९८३ मध्ये आलेल्या जाने भी दो यारों चित्रपटामधून केले होते.

तथापि त्यांना मिस्टर इंडिया चित्रपटामधील कॅलेंडर भूमिकेमधून खरी ओळख मिळाली होती. यानंतर त्यांनी जवळ जवळ १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. १९९३ मध्ये रूप की रानी चोरों का राजा चित्रपटामधून त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि जवळ जवळ डझन भर चित्रपटांचे दिग्दर्शन केले. सतीश कौशिकने प्रत्येक जॉनरमध्ये काम केले, पण त्यांच्या कॉमेडीला तोड नाही.

Leave a Comment